ज्येष्ठ समाजसेवक रवींद्र मोरे यांचा पन्नासावा वाढदिवस उत्साहात साजरा 

माणगांव (उत्तम तांबे) : विश्वशांती उत्कर्ष बौद्धजन मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक, भीमशक्ती संघटनेचे जिल्हा संघटक, बौद्धजन पंचायत समिती माणगांव तालुका अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष युवा नेते रवींद्र भिकु मोरे यांचा पन्नासावा वाढदिवस रविवार दिनांक २९ ऑगस्ट २०२१ रोजी हर्षोउल्हासात साजरा झाला. या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बौद्धजन पंचायत समितीचे सरचिटणीस आर. डी. साळवी यांनी भूषविले होते. 

ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाचे आपण देणेकरी आहोत ही निस्वार्थ भावना उराशी बाळगून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विश्वशांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्ध, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महान विचारांची चळवळ जागृत ठेवून रवींद्र मोरे यांनी आजपर्यंत बहुजन हिताय कार्य केले आहे. रायगड जिल्हा पालकमंत्री आदितीताई तटकरे, माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे तसेच बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे व पक्षाचे प्रामाणिकपणे काम करून सर्वसामान्यांना न्याय व हक्क मिळवून दिला आहे. रवींद्र मोरे यांना कला क्रीडा व शिक्षणाची आवड आहे. तसेच समाजसेवेची सुद्धा मोठी आवड आहे. आपल्या बौद्ध समाजावरच नाही तर बहुजन समाजामध्ये त्यांनी निस्वार्थी पणाने जनसेवा केली आहे. त्यांच्या कार्य कर्तृत्वामुळेच त्यांची पत्नी सौ. माधुरी रवींद्र मोरे ह्या नगरसेविका झाल्या आहेत. 

निर्भिड आणि तत्पर कार्यामुळेच मोरे यांनी आपला एक दरारा निर्माण केला आहे. शासकीय असो वा निमशासकीय प्रत्येक ठिकाणी त्यांची चांगली ओळख असल्यामुळे सर्वसामान्यांच्या हाकेला साथ देऊन सहकार्य केले आहे. आज मोठ्या संख्येने तरुणांचा ताफा रवींद्र मोरे यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या कार्य कर्तृत्वामध्ये जिद्द आणि चिकाटी असल्यामुळे उद्याचे भावी नगराध्यक्ष आम्हाला ते दिसत आहेत. ही त्यांची समाजसेवा व आंबेडकरी चळवळ जागृत ठेवण्यासाठी मोरे यांना निरोगी आयुष्य लाभो अशा प्रकारे विविध संघटनांकडून या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात रवींद्र मोरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. 

या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाला रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती ताई तटकरे, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष विश्वजीत साळवी 'बहुजन दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष भाईसाहेब जाधव, माणगांव माजी नगराध्यक्ष योगिताताई चव्हाण, तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे विधितज्ञ नरेश जाधव, काँग्रेस पार्टीचे युवा नेते ज्ञानदेव पवार, शेकाप युवा नेते निलेश थोरे, बौद्धजन पंचायत समिती माणगांव माजी तालुकाध्यक्ष पत्रकार उत्तम तांबे, माजी जिल्हा सरचिटणीस कीर्तिराज शिर्के, माजी तालुका सरचिटणीस पराग जाधव, शाखा क्रमांक 1 चे अध्यक्ष प्रशांत गायकवाड, शाखा क्रमांक सहा अध्यक्ष निलेश साळवी, शाखा क्रमांक 11 अध्यक्ष संतोष कासारे, शाखा क्रमांक पाच चे सरचिटणीस विवेक जाधव, भीमशक्ती संघटनेचे माणगांव तालुका शहराध्यक्ष आत्माराम घोगरे, माणगांव प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन कदम, पंचशील युवा संघ गोरेगाव रोहन साळवी, मुस्लिम समाजाचे उपाध्यक्ष फैमीद जामदार 'शाखा क्रमांक एक चे सरचिटणीस विनोद मोरे, सहचिटणीस प्रकाश मोरे, युवा नेते दीपक शिलिमकर, राहुल दिपके, शाखा क्रमांक एकचे माजी अध्यक्ष विलास मोरे आदी मान्यवर व बहुजन समाजातील हितचिंतक स्नेही बहुसंख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog