खरोखरच अडचणीच्या ठिकाणी उभे राहतात तेच खरे पत्रकार!
रोहा (समीर बामुगडे) : रायगड जिल्हा अलिबाग रेवदंडा येथे दिनांक 7 सप्टेंबर 2021 रोजी रायगड जिल्हा रोहा तालुका येथील सुदर्शन कंपनीच्या माध्यमातून सर्व पत्रकार मित्र यांना कोरोना योद्धा म्हणून रेवदंडा येथील सुप्रसिद्ध हॉटेल The Fern Silvanus येथे स्नेहभोजन व सत्कार समारंभ सोहळा ज्येष्ठ पत्रकार संपादक अरुण खोरे, रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप व कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट विवेक गर्ग यांच्या मुख्य उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात आलेल्या सर्व पत्रकारांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी माहिती अधिकारी श्री. मनोज सानप यांनी पत्रकारांच्या कामाचा गौरव केला. त्यातच प्रमुख अतिथी श्री. खोरे यांनी कंपनीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली व आभार प्रदर्शनामध्ये ज्येष्ठ पत्रकार श्री. दिलीप वडके यांनी पत्रकारांच्या वतीने आभार व्यक्त केले.
यावेळी कंपनीचे रविकांत दिघे, माधुरी सणस, विशाल घोरपडे, रुपेश मारबते या सर्वांचे उपस्थित सत्कार सोहळा व स्नेहभोजन कार्यक्रम संपन्न झाला.