भानंग गावात पाण्याची गंगा; यापुढेही विकासगंगा वाहील - जिल्हा प्रमुख अनिल नवगणे

पाणी पुरवठा योजनेचे शिवसेनेकडून भुमिपूजन

तळा (संजय रिकामे) : रायगड जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून  वावे धरणाच्या पायथ्याशी असणारया विहिरीतुन भानंग गावात पाण्याची गंगा येणार असुन यापुढे भानंग गावात विकासाची गंगा येणार आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नतद्रष्ट पुढारयांच्या भुल थापांना बळी पडू नका असे प्रतिपादन शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांनी भानंग येथे 57 लक्ष निधी मंजूर झालेल्या योजनेचे भुमीपुजन करताना केले. या भुमिपूजन समारंभास जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, तालुका प्रमुख प्रदुम्न ठसाळ, शहर प्रमुख राकेश वडके, भानंग सरपंच रघुनाथ वाघरे, भानंग ग्रामपंचायत सदस्या सौ. सुलोचना रेवाळे, भानंग ग्रामस्थ अध्यक्ष मधुकर शिगवण, नगरसेवक, ॲड. चेतन चव्हाण, विठोबा चांडीवकर, माजी सरपंच नाना दळवी, लिलाधर खातू, संतोष वाघरे, रुपेश मिरगळ, अजित काते, निलेश खरपुडे, रतिश मिरगळ आदि मान्यवर उपस्थित होते. 

जिल्हा प्रमुख अनिल नवगणे पुढे म्हणाले की, भानंग ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासाठी गेली पंधरा वर्षे झगडत आहेत त्यावेळी आजच्या कामाचे श्रेय घेणारे कुठे गेले होते. भानंग पाणी पुरवठा मंजूर करुन आणण्यासाठी सुरवाती पासुन शिवसेना पक्षाने पाठपुरावा केला आहे, या कामाची वर्क ऑर्डर आल्यानंतर आम्ही भुमिपूजन करणार होतो परंतु राष्ट्रवादी काँग्रेस चे काही नतद्रष्ट पुढारी शिवसेनेने केलेले काम आम्हीच पुर्ण करुन आणले आहे अशी खोटी अफवा पसरवुन पालकमंत्री महोदयांना या कामाचे भुमीपुजन करण्यासाठी आज भानंग गावला आणणार असल्याचे समजले शिवसेना विकासकामांमध्ये कधीच राजकारण करत नाही परंतु आम्ही मंजूर करुन आणलेल्या कामाचे तुम्ही भुमीपुजन करणार असाल तर ते देखील खपवून घेणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी यांनी तळा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामांध्ये भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. विकासकामे पुर्ण न करताच कामाचा निधी काढुन घ्यायचा असे अनेक प्रकार तळा तालुक्यात होत असल्याचे त्यांनी उदाहरणासहीत यावेळी सांगीतले.या कामांची सखोल चौकशी करणार असुन न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. काम करण्याची एक पध्दत असते, दुसरयाने मंजूर केलेल्या कामाचे भुमीपुजन पालकमंत्र्यांनी करु नये असे नवगणे यांनी स्पष्ट सांगितले.

तालुका प्रमुख प्रदुम्न ठसाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड आठवताना केवळ रायगड जिल्हा परिषद मधुन विकासकामांच्या  खोट्या प्रमा आणयच्या आणि त्या प्रमा टक्केवारी घेउन विकायच्या हे धंदे तळा तालुक्यात सुरु आहेत. अनेक कामांत भ्रष्टाचार झाला असल्याची यादी त्यांनी  वाचुन दाखवली. आणि हा भ्रष्टाचार काही दिवसात आम्ही जनतेसमोर आणु, भानंग ग्रामपंचायत पाणी पुरवठा योजना आम्ही मंजूर करुन आणली , या योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे आम्ही पुरवली आणि आता योजना मंजूर झाल्यानंतर ती आम्ही मंजूर करुन आणली असे म्हणणारयांनी एखादा ग्रामपंचायतीचा ठराव तरी दाखवावा, प्रत्येक वेळी कामे आम्ही मंजूर करायची गोर गरिब जनतेला सुविधा आम्ही पुरवायच्या आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा पालकमंत्री आहे म्हणुन गावात दादागीरी करयाची हे खपवून घेतले जाणार नाही, आज आम्ही भानंग येथील पाणीपुरवठा योजनेचे भुमीपुजन केले आहे काही नीतिमत्ता असेल तर पालकमंत्री  भानंग या गावात आज येणार नाहीत असे त्यांनी यावेळी सांगितले.  

Popular posts from this blog