स्वतंत्र्य दिनी शालेय विद्यार्थ्यांना झाडांचे वाटप तर कोवीड योद्ध्यांचा सन्मान, सरपंच ज्योती पायगुडे यांचा अनोखा उपक्रम
तळा (संजय रिकामे) : भारतीय स्वतंत्र्य दिनाचे औचित्य साधून गिरणे ग्रामपंचायत सरपंच सौ. ज्योती कैलास पायगुडे यांनी कोविड योद्धा म्हणून पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांना प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा सन्मान केला. त्याचप्रमाणे गिरणे, मालाठे, वाघवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांना काजू, पेरू, फणस, चिकू यांची कलमे देऊन व महिला बचत गटांना सॅनिटरी पॅडचे मशीन देऊन अनोखा उपक्रम केला आहे.
75 व्या स्वतंत्र्य दिनासाठी गिरणे ग्रामपंचायत सरपंच सौ. ज्योती पायगुुुुडे, उपसरपंच सौ. स्नेहा निर्मल, ग्रामसेवक खंडु काळे, ग्रामपंचायत सदस्या सौ. सायली भगत, सौ. ज्योतना चव्हाण, सौ. प्रभावती सणस, कु. स्मिता सचिन नाक्ती, अंगणवाडी सेविका सौ. प्रतिभा वसंत कीर्तने, संजय गांधी समिती सदस्य सौ. छाया ठमके, व तसेच मोठया प्रमाणात ग्रामपंचायत हद्दीतील महिला ग्रामस्थ उपस्थित होते.
गिरणे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच ज्योती कैलास पायगुडे यांनी ग्रामपंचायती मार्फत ग्रामीण भागात शासकीय योजना राबवण्या बरोबरच विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन तळा तालुक्यात एक आदर्श समोर ठेवला आहे.