मदत नव्हे तर कर्तव्य.!! सम्यक सामाजिक संस्थेने पुसले पिडीतांचे अश्रू
दुर्घटनाग्रस्त कुटूंबांना दिला मदतीचा हात
बेणसे (प्रतिनिधी) : महाराष्ट्रामध्ये, अतिवृष्टीने थैमान घातलेले असतांनाच त्या विद्रोही परिस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील पोसरे या गावी अतिवृष्टी होऊन दुर्घटना झालेल्या कुटुंबांसाठी सम्यक सामाजिक संस्थेने मदतीचा हात दिला.
२१ जुलै ला संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडणाऱ्या विद्रोही अतिवृष्टीने अनेकांचे संसार उद्धवस्त केले. त्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील मौजे पोसरे ता.खेड गावातील नागरिकांवर आस्मानी संकट कोसळले आहे. दिनांक २२/०७/२०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळून सतरा निष्पाप जीव या संकटात गमावले गेले आहेत. तर वाचलेल्या लोकांचे आयुष्य पूर्णतः विस्कळीत झाले असून त्यांना शासकीय यंत्रणेचे मदत कार्य अपुरे पडत आहे. वाचलेल्या जिवांच्या संसाराला सांभाळण्या साठी एक हात मदतीचा देण्याचे काम सम्यक कला, क्रिडा, शैक्षणिक व सामाजिक संस्था, बेणसे, ता.पेण, जि.रायगड ही संस्था आपली सामाजिक बांधिलकी जपत कार्य करीत आहे. एक हात मदतीचा म्हणून जीवनावश्यक सामान व अत्यावश्यक वस्तूंचे पॅकेज तयार करून पोसरे, ता. खेड येथे येऊन वाटप केले.
याप्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत पोसरे, ता. खेडच्या सरपंच सौ. साजिदा खेरटकर, उपसरपंच रविंद्र मोहिते, शाम मोहिते, अजय मोहिते, सम्यकचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत पांडुरंग अडसुळे, सचिव प्रमोद दयानंद काकडे, खेड तालुक्यातील समाजसेविका अंकीता ताई शिगवण, बचत गटाच्या उपाध्यक्षा सौ. कांचन चंद्रकांत अडसुळे, विजयदादा अडसुळे, अमित पांडुरंग अडसुळे, आदिनाथ अडसुळे, प्रशांत दामोदर काकडे, नितीन मोने, प्रसाद काकडे, शुभम पिंगळे, सोमनाथ भौड, अजय महाले, स्वप्नील ठाकूर, तुळशीराम कुथे, ज्ञानेश्वर कोळी, प्रमोद शेलार आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम दरड कोसळलेल्या जागेची पाहणी करून सरपंच आणि ग्रामस्थ यांच्याशी संवाद चंद्रकांत अडसुळे यानी साधून मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी श्रद्धांजलीपर भाषणात सम्यक संस्थेचे अध्यक्ष यांनी शासनाने योग्य त्या उपाययोजना दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला पुरवाव्या आणि सामाजिक संघटनेने देखील खेड पासून आत असलेल्या पोसरे गावाला भेट देऊन दुर्घटनाग्रस्त कुटुंबाना शक्य होईल तेवढी मदत करावी असे आवाहन केले. त्यानंतर सरपंच सौ. साजिदा खेरटकर यांनी आपली संस्था रायगड वरून येऊन सहकार्य केल्यास आभार व्यक्त केले.