पत्रकार संतोष सुतार आदिवासी मित्र पुरस्काराने सन्मानित
साई/माणगांव (हरेश मोरे) : दक्षिण रायगड आदिवासी हितरक्षक संघटना व रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटना माणगांव व रोहा विभाग यांच्या माध्यमातून ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन मोठया उत्साहात माणगांव येथील वनवाशी आश्रम शाळेत साजरा करण्यात आला.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या समाजातील व्यक्तींना आदिवासी मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. माणगांव तालुक्याचे तालुका प्रेस क्लब अध्यक्ष संतोष सुतार यांना आदिवासी मित्र पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. संतोष सुतार हे नेहमी समाजातील सर्वसामान्य, दुर्बल, आदिवासी गोरगरीब जनतेच्या हिताची कामे करीत असतात त्या कामाची दखल घेऊनच त्यांना पुरस्कार देण्यात आला.
संयुक्त राष्ट्रसंघाने आदिवासी समाजाच्या समस्या, त्यांचे अधिकार, हक्क अस्तित्व यांचे रक्षण व्हावे म्हणून १९९४ साली संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक आदिवासी वर्ष घोषित केले. यावेळी आदिवासी बांधवानी परंपरिक वाद्य घेऊन नृत्य सादर केले. यावेळी महादेव जाधव, गोरेगावचे पोलीस उपनिरीक्षक नवले, कोलाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव, कोलाडचे पत्रकार विश्वास निकम, माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आश्वानात खेडकर, फादर रिची भाऊ, सामाजिक कार्यकर्ते संजय घाग, पंचायत समिती माजी कृषी अधिकारी काप यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यकमाचे नियोजन भिवा पवार व राजेंद्र पाटील यांनी योग्य रित्या केले. या कार्यकमासाठी माणगांव व रोहा तालुक्यातील आदिवासी बांधव तसेच बहुजन समाजातील मान्यवर उपस्थित होते.