ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

तळा कृषी विभागाच्या वतीने रानभाज्यांचे प्रदर्शन

तळा (संजय रिकामे) : महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने रान भाज्याचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. आयुर्वेदात आहारात रान भाज्यांचे अनन्य साधारण महत्त्व आहे या रानटी औषधी वनस्पतींचा आहारामध्ये महत्त्व वाढावे तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माणसाची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे या दृष्टीने राज्याचे कृषी मंत्री ना. दादा भुसे यांच्या संकल्पनेतून रानभाज्याचे महत्व पौष्टिक औषधी गुणधर्म विचारात घेऊन जनजागृती लोकांपर्यंत अधिकाधिक पोहोचावी. तसेच ॲलोपेथीक औषधांची निर्मिती आयुर्वेदिक वनस्पती पासूनच होते या दृष्टीने कृषी विभागाच्या वतीने तळा एस् टी स्टँड मध्ये रानभाज्याचा महोत्सवाचे आयोजन १२ ऑगस्ट रोजी करण्यातआले होते.यामहोत्सवाचे उद्घाटन सभापती पं.स.अक्षरा कदम याांच्या हस्तेे करण्यात आले यावेेळी पं.स. सदस्य देवकी लासे तळा नगराध्यक्षा रेश्मा मुंढे, तालुका कृषी अधिकारी तथा मंडल अधिकारी सागर वाडकर, क्षेत्रीय अधिकारी, पर्यवेक्षक आदि मान्यवर उपस्थीत होते. या महोत्सवात भारंग, कुडा, अळु, माठ, दिंडी, कल्याणी आळू, कंटोली, सुरण, तुळस, कढीपत्ता, तेरी, टाकळा वगैरे ३०/३५ प्रकारच्या रानटी भाज्या ठेवण्यात आल्या होत्या. यामध्ये प्रगतीशील शेतकरी मधूकर वारंगे, महम्मद परदेशी, यांनी सहभाग घेतला होता. या महोसत्वाला अनेक मान्यवर व्यक्तीनी, आयुर्वेद प्रेमींनी भेटी देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या. 

Comments

Popular posts from this blog