महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या रोहा तालुका अध्यक्ष पदावर किरण मोरे यांची नियुक्ती
रोहा (समीर बामुगडे) : महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार महासंघाच्या रोहा तालुक्यातील कार्यकारिणीची बैठक शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. या बैठकीला महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री. रघुनाथ कडू उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या गुणवत्ता व कामांच्या श्रेयावरुन रोहा तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली. सर्वप्रथम नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांचा यथोचित सत्कार केला. त्यानंतर अजंटाप्रमाणे विषय घेण्यात आले. अध्यक्षांनी प्रत्येकांच्या कामांचा आराखडा जाणून घेतला.
तसेच प्रत्येकाचे मनोगत ऐकून अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा प्रस्ताव मांडून गुणत्ता व कार्यप्रणाली पाहुन मान करते श्री किरण मोरे यांना तालुका अध्यक्षपद नियुक्ती व श्री. शिवाजीराव जाधव यांना उपाध्यक्ष पदी नेमण्यात आले. सदरील कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला. बैठकीला उपस्थित जेष्ठ कार्यकर्ते एकनाथ मळेकर, मारुती सर्लेकर, कल्पेश पवार, समीर बामुगडे, रविंद्र मोरे, प्रसाद मोरे, गायकर, प्रकाश मोरे, भोईर इत्यादींची उपस्थिती होती. निवडीनंतर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नवनिर्वाचितांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.