बोरघर येथील पॉली हाऊसमुळे वावे धरणाचे पाणी दुषित! 

पंचक्रोशीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

तळा (संजय रिकामे) : तळा तालुक्यातील वावे धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आजूबाजूच्या परिसरातील गावांना होतो. यामध्ये वावे, बोरघर, सोनसडे भानंग, पाचघर, कळमशेत या गावांचा समावेश होत असून यावर्षी धरणाचे पाणी गढूळ झाले असून पिण्यालायक राहिलेले नाही. ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते त्यामुळे या गावातील नागरिकांना ऐन पावसाळ्यात पायपीट करून पाणी दूरवरून डोक्यावर आणावे लागत आहे. प्रतीवर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात पडुन देखील हि समस्या उद्भवली नव्हती. मात्र या वर्षी ही गंभीर समस्या कशी निर्माण झाली याचा शासनाने परीक्षण करणे गरजेचे झाले असून धरणा लगत समोर आलेल्या बिल्डरने जवळपास १०० एकर जागा घेऊन पॉली हाऊस नर्सरी निर्मिती करताना संपूर्ण डोंगरावरील झाडांची कत्तल करून जमीनीचे उत्खननात प्रचंड प्रमाणात चालू आहे. त्यामुळे सर्व माती धरणात वाहून आली आहे व झाडी तोडल्याने  पर्यावरणाचा ऱ्हास होऊन वावे धरणांमध्ये सर्व माती वाहून येवून पाणी पिण्या योग्य राहीलेले नाही धरणा लगत गावांना पाणी पुरवठाकरणाऱ्या विहिरीतील पाणी गढुळ होऊन अतिशय खराब झाले आहे. अंघोळीसाठी वापर केला तरी खाज खरूज त्वचा रोग होण्याचा प्रादुर्भाव होत आहे. शासनाकडून पर्यावरण उत्खननाच्या परवानग्या कशा दिल्या आणि किती दिल्या. रॉयल्टी कितीभरली. अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली जात आहे. अशा प्रकारच्या पर्यावरणावर आणि मानवी जीवनावर परिणाम करणारे प्रकल्प उभे करताना पर्यावरणाला धोका तर निर्माण होत नाही परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार तर नाही ना याचा विचार शासनाने करणेआवश्यक होते. सद्यस्थितीत फिल्ट्रेशन प्लॅन्ट नसल्याची माहिती प्राप्त झाली असून या परिस्थितीची पाहणी संबधीत विभागाने करुन या पॉली हाऊस मालकावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

Popular posts from this blog