राज वैशंपायन यांना बी.एम.एम. पदवी प्रदान
नागोठणे (वार्ताहर) : नागोठणे येथील महाराष्ट्र राज युवा पत्रकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष तथा माझा रायगड लाईव्ह चे संपादक राज वैशंपायन यांना मुंबई विद्यापीठाची पत्रकारिता क्षेत्रातील मानाची अशी (B.M.M.) बॅचलर ऑफ मास मिडीया ही पदवी प्रधान करण्यात आली. राज वैशंपायन यांनी अल्पावधीत आपल्या पत्रकारितेचा ठसा नागोठणे विभागात चांगल्या प्रकारे उमटवला आहे. आपल्या धारदार लेखणीतून त्यांनी कित्येकदा अन्यायाला वाचा फोडली आहे. विवीध आंदोलनांमध्ये सक्रीय सहभाग घेऊन गोरगरिबांना न्याय मिळवून दिला आहे. आजवर त्यांनी मोठमोठ्या दैनिकांमध्ये वृत्तलेखनाचे उत्कृष्ठ कार्य केले आहे. माझा रायगड लाईव्ह या वृत्तवाहिच्या माध्यमातून विविध प्रश्नांना वाचा फोडत असून सर्वसामान्य जनतेसाठी हक्काने भांडताना दिसत आहेत आज त्यांना मुंबई विद्यापीठाची मानाची अशी बी.एम.एम. पदवी मिळाल्याबद्दल नागोठणे विभागतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.