बोर्लीपंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एस. राम अँन्ड एम. राम या संस्थेतर्फे ॲटोमॅटीक सेनीटायझर मशीन भेट
बोर्लीपंचतन (मुझफ्फर अलवारे) : मुरुड येथील जाहीद फकजी यांनी ॲटोमॅटीक सेनीटायझर चे मशीन बोर्लीपंचतन येथील प्राथमिक आरोग्य केद्रात आज बसविली आहे. सदर मशीन बसविण्यात पत्रकार उदय कळस व मुझफ्फर अलवारे यांच्या विनंतीला मान देऊन बसविली असुन संस्थेचे अध्यक्ष फैयाज दामाद (मुंबई) व त्यांचे मॅनेजर जाविद वास्कर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे.
सस्थेच्या माध्यमातून कोरोना काळात पाच-सहा ठिकाणी मशीन बसविल्या आहेत. जाहीदभाई फकजी हे सामाजिक कार्यकर्ते असून आरोग्य, शैशणिक व समाजातील रंजल्या-गाजल्यांसाठी नेहमीच एक हात मदतीचा घेऊन ते पुढे असतात.
बोर्लीपंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वाढत्या ओपीडीची संख्या डिलेव्हरी केसेस आणि लसिकरणाच्या वेळी वाढती नागरीकांची गर्दी यासाठी येथे सेनीटायझर मशीनची अत्यंत गरज होती त्याची पुर्तता जाहीद फकजी यांनी केली आहेत.
मशीनचे उद्घाटन दिघी सागरीचे पोलीस निरीक्षक श्री. संदीप पोमण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डाॅ. सुरज तडवी यांनी सेनीटायझर मशीनची दवाखान्यात गरज होती ती गरज जाहीद फकजी यांनी पूर्ण केली असल्याने त्यांना धन्यवाद देऊन आभार मानले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अफजलभाई महमद मेमन, कर्मचारी वर्ग, वासीम फकजी, पत्रकार मुझफ्फर अलवारे इत्यादी उपस्थित होते.