ॲड. योगेश तेंडुलकर आदिवासी मित्र पुरस्काराने सन्मानित 

माणगांव (प्रतिनिधी) : ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त दक्षिण रायगड आदिवासी हितरक्षक संघटना व रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी समाजासाठी उल्लेखनीय कामगिरी करणे, जनजागृती करणे, आदिवासी मुलांना दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण पूर्ण करणे, विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन प्रोत्साहित करणे तसेच त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणे या बाबी लक्षात घेऊन ॲड. योगेश अवधूत तेंडुलकर यांना जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून संघटनेचे अध्यक्ष भिवा पवार, उमेश जाधव, रा.जि.प.सदस्य दयाराम पवार, रा.जि.प. सदस्य वासंती वाघमारे, संतोष वाघमारे, नथुराम वाघमारे, सुदाम जाधव, देऊ हिलम, बबन कोळी, संजय कोळी, नामदेव हिलम, जगन मुकणे, धर्मराज कोळी  व अन्य मान्यवरांच्या हस्ते आदिवासी मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

या पुरस्काराबद्दल आपले मत व्यक्त करताना ॲड. योगेश तेंडूलकर यांनी उपस्थित आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या समाजाची प्रगती व्हायची असेल तर आपण आपल्या पाल्यांना शिक्षण द्या. शिक्षणाने माणसाची प्रगती होते. आज समाजाच्या उन्नतीसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत मात्र आपल्या शिक्षणाअभावी आपणास त्या योजनांच्या लाभासाठी वंचित राहावे लागते म्हणून शिका व संघटित व्हा! अंधश्रद्धा व्यसन यापासून दूर रहा. आपापसातील तंटे सामोपचाराने मिटवा. वेळ व पैसा वाया घालवू नका असेही त्यांनी शेवटी सांगितले.

Popular posts from this blog