नागाव-म्हातवली ग्रा. पं. मार्फत कोविड कॅम्प
उरण (प्रियंका म्हात्रे) : ओएनजीसी प्लांटच्या सीएसआर निधीतून कोविड कॅम्पचे आयोजन मंगळवारी करण्यात आले. यावेळी उरण, नागाव, म्हातवली येथील विविध नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लसीकरणाचा लाभ घेतला.
ओएनजीसी प्लांटच्या सौजन्याने कोविड कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. सदर कॅम्प उरण येथील सोमवंशी क्षत्रिय पाठारे समाज हॉल येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात उरण तालुक्यातील विविध नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला व अगदी शिस्तबध्द पद्धतीने सदर कॅम्प यशस्वीरित्या पार पडला.
सदर कॅम्प यशस्वी करण्यासाठी नागाव-म्हातवली ग्रामपंचयतीने विशेष मेहनत घेतली. या प्रसंगी म्हातवली ग्रामपंचयत सरपंच रंजना चारुदत्त पाटील, माजी सरपंच आनंद घरत, नागाव ग्रामपंचायत सरपंच चेतन गायकवाड, उपसरपंच भूपेंद्र घरत, सदस्या निलिमा प्रदीप थळी, अमृता घरत, दीपिका पाटील, सुरेखा थळी, प्रिया पाठारे, सदस्य मोहन काठे, जितेंद्र नाईक, अक्षय वाघमारे, उपसरपंच पल्लवी म्हात्रे, चेतन नवलागी, ग्रामविकास अधिकारी किरण केणी, ग्रामसेविका ज्योती पाटील व सर्व कर्मचारी वर्ग यांनी विशेष मेहनत घेतली.