बौद्ध सहाय्यक संस्था मुद्रे-मुंबई यांच्या विद्यमाने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप 

रायगड (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यातील बौद्ध सहाय्यक संस्था मुद्रे-मुंबई यांच्या माध्यमातून महाड तालुक्यातील पुरगरस्तांना आणि गरजवंताना एक हात मदतीचा आणि कर्तव्याचा या उद्देशाने महाड तालुक्यातील पुरग्रस्तांचा सर्व्हे करून प्रत्यक्ष त्याठिकाणी जाऊन त्यांच्या गरजा समजून घेऊन त्यांना मदत करण्यात आली. याकरिता संस्थेतील सभासद त्या ठिकाणी घटनास्थळी जागेवर जाऊन आढावा घेऊन एक हात मदतीचा देऊन एक विचाराने एक संघटित होऊन एकमेकांशी हाताला हात देऊन पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू, धान्य, कपडे इत्यादी वस्तूंच्या स्वरूपात संस्थेचे सदस्य आणि स्थानिक अध्यक्ष जनार्धन हाटे, स्मिता हाटे, सचिन हाटे, प्रफुल हाटे, मंगेश हाटे, गौरव पवार, सुदेश हाटे, प्रमोद हाटे, आदेश हाटे, विशाल हाटे, प्रवीण हाटे, सनी मोरे, संदेश हाटे, राजाराम हाटे गौतम हाटे, संदीप मोरे, प्रकाश हाटे इत्यादींनी सहकार्य केले.

Popular posts from this blog