अेल्पे कंपनीत कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! 

दोन कामगारांची बोटे तुटली, कामगारांना धोका कायम!

रोहा (समीर बामुगडे) : धाटाव औद्योगिक परिसरातील अेल्पे केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत सुरक्षेआभावी दोन कामगारांची हाताची बोटे तुटटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. "कामात ठेवा सुरक्षा, देव करेल तुमची रक्षा" असे ब्रीदवाक्य या कंपनीच्या गेटवर लिहीलेले आहे, परंतु हा फक्त दिखावा असून येथे कामगारांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे. 

अेल्पे कंपनीतील कामगार तन्मेश ढमाले (रा. झोलांबे) आणि सौरभ टवळे (रा. खांब) या दोन कामगारांच्या हाताची बोटे तुटली आहेत. त्यामुळे येथे सुरक्षेचा आभाव दिसून आलेला आहे. यामध्ये धाटाव औद्योगिक असोसिएशनचे अध्यक्ष पी. पी. बारदेशकर यांचा हलगर्जीपणा दिसून आलेला आहे. तसेच या कंपनीच्या सेफ्टी सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या फॅक्टरी इन्सपेक्टरवर प्रथम कारवाई करण्यात यावी, तसेच पी. पी. बारदेशकर यांच्यावर देखील हलगर्जीपणाबद्दल कारवाई करण्याची मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे.

Popular posts from this blog