एक्सेल कंपनीच्या परिसराला प्रदूषणाचा विळखा!

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी कंपनीवर धडकले

प्रदूषण रोखण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाला अपयश!

धाटाव (प्रतिनिधी) : धाटाव औद्योगिक परिसरातील एक्सेल कंपनीच्या भयानक प्रदूषणामुळे या परिसरातील स्थानिक नागरिकांचे जीवनमान धोक्यात आलेले असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उत्तम माने यांनी कंपनीवर धडक देऊन तेथे पाहणी केली व कंपनीतून सोडण्यात येणारे केमिकल मिश्रीत काळ्या रंगाचे पाणी सँपलसाठी ताब्यात घेतले. 

या कंपनीतून गंगा नदीच्या पात्रात केमिकलयुक्त दुषित पाणी सोडले जात असून या परिसरात रोठ खुर्द, रोठ बुद्रूक, निवी,वाशी, लाढर तळाघर, बोरघर या गावांतील नागरिकांच्या शेतीवर देखील या प्रदूषित पाण्याचा गंभीर परिणाम होऊन येथील भातशेती उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेली आहे. 

विशेष म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी प्रत्येक वेळी कंपनीत येऊन पाहणी करतात व प्रदूषित पाण्याची तपासणी करतात, पण आजपर्यंत हे प्रदूषण थांबविण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना अपयश आलेले आहे.

Popular posts from this blog