धाटाव परिसरात सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन फुटली! 

दुर्गंधी पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका! 

रोहा (समीर बामुगडे) : धाटाव औद्योगिक परिसरातील कंपन्यांचे सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन फुटल्याने येथे दुर्गंधीयुक्त पाणी पसरल्याने या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. 

धाटाव औद्योगिक परिसरातील डी.एम.सी., सॉल्वे, दानसनंद, डी.आर.टी.-2, अनसुल या कंपन्यांचे सांडपाणी वाहून नेणारी 

पाईपलाईन फुटल्याने या परिसरात दुर्गंधी पसरू लागली आहे. यामुळे रोठ खूर्द, रोठ बुद्रूक परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आधीपासूनच प्रदूषणाच्या समस्येने त्रस्त झालेल्या येथील नागरिकांपुढे आता दुर्गंधीचे नवीन संकट उभे राहिले आहे. दरम्यान, धाटाव औद्योगिक असोसिएशनचे अध्यक्ष पी. पी. बारदेशकर हे या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

Popular posts from this blog