नारायण राणे यांच्या आक्षेपार्ह विधानाचा तळा शिवसेनेतर्फे निषेध
तळा (संजय रिकामे) : केंद्रीय लघु,सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा तळा शिवसेनेतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान महाड येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले असून सर्वत्र त्यांच्या वक्तव्व्याचा निषेध करण्यात येत आहे.तळा तालुक्यातील शिवसैनिकांकडून नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.शिवसेना शाखेपासून बळीच्या नाक्यापर्यंत शिवसैनिकांनी राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा बनवून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.यावेळी तहसीलदार यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले तसेच नारायण राणे यांना अटक केले नाहीतर येत्या दोन दिवसांत शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याचे तालुका प्रमुख यांनी सांगितले. याप्रसंगी तालुका प्रमुख प्रद्युम्न ठसाळ, शहर प्रमुख राकेश वडके, उपनगराध्यक्ष सायली खातू, नगरसेविका नेहा पांढरकामे, नंदिनी खातू, गणेश तळेकर, सहदेव पारधी, संदीप दळवी, मंगेश शिर्के विभागप्रमुख शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.