रोहेकरांच्या पाचवीला पूजलेय कंपन्यांचे भयानक प्रदूषण!

धुक्यातून सुरु असलेल्या कंपन्यांच्या हातचलाखीकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष 

रोहा (समीर बामुगडे) : रोहे शहराला लागुन असलेल्या औद्योगिक विभागाचे धुक्यातून प्रदूषण होत असल्याचा अनुभव सामान्य रोहेकर दररोज अनुभवत आहेत. पण या प्रदूषणाच्या हातचलाखीकडे प्रदुषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करत असल्याने हा मुद्दा गंभीर बनला आहे.

धाटाव औद्योगिक  वसाहतीच्या  रासायनिक कंपन्याकंडुन होणाऱ्या  वाढत्या प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य  व पर्यायाने  जिवन धोक्यात  आले आहे. खुल्या नैसर्गिक वातावरणात सकाळी फेरफटका मारायला सर्वांना आवडते. पण सकाळी मस्त धुंद धुक्यातून जेव्हा कुणीही चालायला जातात तेव्हा श्वसनातुन आपण रासायनिक दूषित हवा आत घेतो हे त्वरित जाणवते. त्यामुळे हनुमान टेकडीकडे जाणारी वर्दळ आता तहसील कार्यालयाच्या बाजूने धावीर मंदिराच्या मागील बाजूने गौळवाडी कडे वळली आहे. अगदी नव्या रोहे-अष्टमी पुलावर देखील धुक्यातून रसायने मिश्रित हवा अनुभवायला मिळते. 

सामान्य माणसाला अनुभव उघड व सुचक असताना शासन व प्रशासनाने याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मुळात रोहेकरांना हे प्रदुषण म्हणजे कायमची डोकेदुखी बनली आहे. वायुप्रदुृषण तर पाचवीला पुजले आहे. परतु या कंपन्यातुन सोडण्यात येणा-या पाण्याने जल आणि जमिन याचेही मोठया प्रमाणात नुकसान होत आहे.

 दमा ,खोकला यासारखे आजार वाढुन येथील वैद्यकीय यंत्रणाना श्वसनाचा आजार सुरु झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. राठी स्कुल रोह्यापासून जवळ धाटाव औद्योगिक क्षेत्रातच आहे. या ठिकाणी सकाळी आपल्या मुलांना शाळेत सोडायला जात असलेल्या पालकाना डोळ्यांत चुरचुर व नाकाला तिव्र रासायनिक दर्प नाईलाजाने सहन करावा लागतोय. त्यामुळे  सकाळी चालायला जाणाऱ्या  नागरिकाना सुध्दा हवेमधून शुद्ध ओक्सीजन ऐवजी रासायनिक हवेची भेट या कंपन्याकंडुन मिळत आहे. जसे चोर अंधाराचा गैरफायदा घेतात त्याचप्रमाणे या कंपन्यानी वाढलेल्या धुक्याचा  गैरफायदा घेऊन वायुप्रदुृणात वाढ केली आहे. प्रामुख्याने याचा त्रास लहान बालके, महिला व वृध्द मंडळीना फार होत आहे. या प्रदुषणामुळे नागरिकाना सकाळ संधाकाळी फिरणे मुश्कील झाले असुन येथील जनजीवन विस्कळीत  झाले आहे. याबाबत स्थानिक मंडळीनी  वारंवार तक्रारी करूनही प्रदुषण मंडळ काहीही कारवाई करीत नसल्याचेे नागरिकाचे म्हणणे आहे.

भारतातील भोपाळ गैसकांड खुप भयानक झाले होते. अशा घटनाना आळा न घातल्यास सर्वांना एक अनामिक भीती वाटु लागली आहे. या प्रकारामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यप्रणालीवरच आता प्रशचिन्ह निर्माण होउ लागले आहे.याबाबतीत स्थान प्रशासन तसेच वरिष्ठांनी तातडीने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी अन्यया जर का येथे मोठा अनर्थ घडला तर त्याला प्रदुषण वियंत्रण मंडळच जबाबदार असेल असे येथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

Popular posts from this blog