कुत्रा चावला, इंजेक्शन नाही, आदिवासी मुलीला पाठविले चक्क अलिबागला! 

माणगांव उपजिल्हा रुग्णालयातील अजब प्रकार 

बहुजन युथ पॅंथर, आदिवासी संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात

माणगांव (प्रतिनिधी) : गोरगरीब आदिवासी जनतेला मोफत उपचार मिळावा त्यांची आर्थिक लूट होऊ नये म्हणून शासनानेच उपजिल्हा रुग्णालयाची निर्मिती केली आहे. त्यातच हातावर कमावून पानावर खाणारा आदिवासी समाज, कोरोना काळात रोजगार नसल्याने आदिवासी बांधवांची फार हलाखीचे दिवस आले आहेत. या गरिबीचे मात्र भेंडवडे उडवलेआहेत माणगांव उपजिल्हा रुग्णालयाने आदिवासी मुलीला कुत्रा चावल्याने तिला इंजेक्शन घेण्यासाठी चक्क अलिबागला पाठवले असल्याची घटना घडली. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की  माणगाव तालुक्यातील पानोसे येथील दहा वर्षे आदिवासी मुलगी कु. अर्चना रामदास कोळी (वय 10 वर्षे) या मुलीस पिसाळलेल्या कुत्र्याने दिनांक 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी चावा घेतल्याने सदर मुलीचे वडील रामदास कोळी हे माणगांव उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले असता येथील ड्युटीवर असणाऱ्या फक्त डॉक्टर व नर्स यांनी तुम्ही अलिबागला जा आमच्याकडे इंजेक्शन नाही! असे सांगून अलिबागला जाण्यास सांगितले व तसे पत्र सुद्धा दिले. ही माहिती मिळताच बहुजन युथ पॅंथरचे तालुकाध्यक्ष रोहनभाई शिर्के यांनी व आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते  उपस्थित असणारे डॉक्टर व नर्स यांच्याशी विचारणा केली असता उडवाउडवीची व उद्धटपणाची उत्तरे देण्यात आली. आम्हाला हे औषध खरेदी करण्याची परवानगी नाही, तुम्ही अलिबागला जा! असा असा सल्ला देऊन हात झटकले. याबाबत येथील वैद्यकीय अधिकारी प्रदीप इंगोले यांचे संपर्क साधला असता  आपला मोबाईल तात्काळ बंद केला. त्यामुळे या वैद्यकीय अधिकाऱ्याला आदिवासी जनतेची ॲलर्जी आहे का? अशी परिसरात चर्चा होत आहे! गोरगरीब आदिवासी जनतेला मोफत औषधोपचार व्हावा तसेच येथील अधिकारी वर्गाने लोकांशी कसं वागावं हे माणगांवच्या उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना त्यांना प्रशिक्षण देण्यात यावेअशी मागणी एकलव्य आदिवासी संघटनेचे संजय कोळी यांनी व्यक्त केली. 

सदर हाताला रोजगार नाही पदरी पैसा नसताना सदरचे आदिवासी व्यक्तीला  आपल्या मुलीला अलिबागला घेऊन औषधोपचार करण्यासाठी  जाणार. त्यामुळे या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांबाबत संताप व्यक्त केला जात असून येथील बहुजन युथ पॅंथर, तसेच रायगड जिल्हा एकलव्य संघटना, तसेच दक्षिण आदिवासी संघटना या संघटनेच्या या संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे समजते. तसेच दवाखान्यातील अधिकारी हे आलटून पालटून रजेवर जात असल्याची खंत दक्षिण रायगड संघटनेचे अध्यक्ष उमेश जाधव यांनी व्यक्त केली. याबाबत रायगडच्या पालकमंत्र्यांनी उपजिल्हा आदिती तटकरे यांनी या उपजिल्हा रुग्णालय कडे दुर्लक्ष झाले झाले असल्याचा आरोप देखील आदीवासी संघटनेकडून केला जात आहे. त्यामुळे अधिकारी वर्गाचे जास्त फावले असून बोलले जात असून येथे अनेक मशनरी बंद अवस्थेत असून ऑपरेटर नाही या "गोंडस" या सबबीखाली ते बंद ठेवले जात असून "तुम्ही आम्ही भाऊ भाऊ, सारे मिळून खाऊ!" असा प्रकार येथील अधिकारी वर्गाबाबत असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. माणगांव उपजिल्हा केंद्राच्या गलथान कारभाराबाबत लवकरच बहुजन युथ पॅंथर, रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटना, दक्षिण रायगड आदिवासी संघटना आंदोलन करणार असल्याचे समजते! रुग्ण कल्याण समिती मधील लाखो रुपये जातात कुठे??? गरीब आदिवासी जनतेला औषध उपचार व्हावा आणि औषधांची कमतरता भासली तर रुग्ण कल्याण समिती मध्ये असलेला निधी खर्च  करण्याची तरतूद येथील डॉक्टरांना असते, मग हे रुग्ण कल्याण समिती मध्ये असणारे लाख रुपये जातात कुठे? की रुग्ण कल्याण समितीच्या निधीचा  वापर मर्जीतल्या पुढाऱ्यांच्या लोकांसाठीच केला जात तर नाही ना? असा प्रश्न रायगड जिल्हा आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भिवा पवार यांनी उपस्थित पत्रकारांसमोर सादर केला असून या उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथील गैरसोईबाबत आदिवासी समाज आंदोलनाच्या पवित्र्यात आहे असे  सांगितले.

Popular posts from this blog