रानभाज्यांचे आपल्या आहारातील स्थान अनन्यसाधारण! - पालकमंत्री आदिती तटकरे
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव संपन्न
रोहा (रविना मालुसरे) : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) मार्फत जागतिक आदिवासी दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक सभागृह, फ्रुट मार्केट रोहा येथे दि. १५ ऑगस्ट २०२१ रोजी जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सदर महोत्सवाचे उद्घाटन मा. पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. उज्वला बाणखेले, "आत्मा"चे प्रकल्प उपसंचालक श्री. बोराडे, तहसिलदार रोहा, गट विकास अधिकारी, सभापती, आदि मान्यवर उपस्थित होते.
महोत्सवामधे गावदेवी बचत गट ,बापदेव बचत गट, वरदा खामजाई शेतकरी गट व इतर शेतकरी यांनी विविध रानभाज्यासह सहभाग घेतला.
या महोत्सवामध्ये भारंगी, कूडा, टाकळा, कैला, पेवा, दिंडा, बांबू, करटोली, कुरडू, केना, अळू, केळ्फुल, शेवगा, टाकळा, शतावरी अशा विविध 40 रानभाज्यांचा समावेश होता.
या महोत्सवात तालुका कृषि अधिकारी श्री. कुमार जाधव यांनी अशा महोत्सवामुळे रानभाज्या विक्रिस चालना मिळेल व त्यांचे महत्व सर्वसामान्य व शहरी लोकापर्यंत पहोचण्यास मदत होइल असे सांगितले.
सदर कार्यक्रमात मंडळ कृषि अधिकारी , कृषि पर्यवेक्षक कृषि सहायक, बिटीएम सेवक, कर्मचारी उपस्थित होते.