रोठ बुद्रुक येथे ग्रामसचिवालय व महिला कार्यशाळेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन संपन्न
रोहा (समीर बामुगडे) : रोहा तालुक्यातील रोठ बुद्रुक या गावात त्यांनी बांधलेल्या ग्रामसचिवालय व महिला कार्यशाळेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन शिवसेनेचे आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी व भाजपा जिल्हा अध्यक्ष महेश मोहिते यांचा हस्ते करण्यात आले त्यानंतर पाहुण्यांच्या सत्कार सोहळ्याची सुरवात शिक्षक संतोष तपकीरे व इतर सहकाऱ्यांनी स्वागतगीत करून केली. त्यानंतर रोठ बुद्रुक ग्रामपच्यायती तर्फे सरपंच श्री. नितीन वारंगे व भाजपा दक्षिण जिल्हा अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य श्री. अमित घाग व सदस्यांनी आलेल्या पाहुण्या चे स्वागत केले व महिला कार्य शाळेच्या उदघाटना चे औचित्य साधून ग्रामपंचायत परिसरातील 5 कर्तृत्ववान महिलांचा पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर सर्वप्रथम अमित घाग यांनी कार्यक्रमात मनोगत मांडताना ग्रामपंचायत युतीच्या ताब्यात घेण्यासाठी जो संघर्ष केला त्याचा पाडा वाचला त्या संघर्षांत आलेल्या पाहुण्यानी व जनतेने साथ दिली त्याबद्द्ल कृतज्ञता वक्त केली. सरपंच नितीन वारंगे यांनी सांगितले की आम्ही या वास्तूचे भूमिपूजन 21 फेब्रुवारी 2021 ला केले व या कमी कालावधीत पूर्ण करून घेतले व गावदेवी चे मंदिर व इतर कामे करण्यास पाहुण्यांकडे सहकार्य मागितले. त्यानंतर पाहुण्यांनी आपल्या भाषणात सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख समीर शेडगे, ॲड. मनोजकुमार शिंदे, प्रशांत मिसाळ शिवसेना उपजिल्हाप्रमुख, विजय बोरकर, ग्राहक संरक्षण कक्ष दक्षिण रायगड, निताताई हजारे, महिला रोहा तालुका प्रमुख, सोपान जांभेकर भाजपा रोहा तालुका अध्यक्ष, समीक्षा बामणे नगरसेवक रोहा, विष्णू लोखंडे, गोपीनाथ गंभे, हर्षद साळवी, राजेश काफरे, शैलेश रावकर, सुनील फुलारे इत्यादि मान्यवर उपस्थित होते सदरहु कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना व भाजपा कार्यकर्ते व महिला आघाडीने विशेष मेहनत घेतली व शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला.