संभाजी ब्रिगेड मुंबई-गोवा हायवेच्या कामातील दिरंगाई विरोधात करणार आंदोलन
कोकण संपर्क प्रमुख प्रदिप कणसे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला इशारा
माणगांव (प्रमोद जाधव) : दक्षिण रायगड संभाजी ब्रिगेडची पुनर्गठन, पुनर्बांधणी व जिल्हा कार्यकारिणी बरखास्ती व नूतन कार्यकारिणी निवड, कार्यकर्ता मेळावा व पत्रकार परिषद माणगांव शहरातील हॉटेल ओपन अँब्रेला येथे पार पडली.
या पत्रकार परिषदेस व मेळाव्यास प्रमुख उपस्थिती म्हणून कोकण संपर्क प्रमुख प्रदिप कणसे, कोकण
विभाग अध्यक्ष सचिन सावंत-देसाई, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सुभाष सावंत, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष सतिष पाटील, रायगड उत्तर जिल्हा सचिव संतोष कदम इत्यादी पदाधिकारी व मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड माणगांव तालुक्यातील पदाधिकारी अनिकेत कांबळे, राजू सुतार, निलेश महाडिक, अनुज पाडसे, गौरव नाईक, देवांशू आरेकर, योगेश मोडकुळे, प्रशांत बालगुडे, अजित सुतार, दत्ता सुतार, पृथ्वीराज खाडेआदी उपस्थित होते.
यावेळी संथ गतीने होत असलेले मुंबई-गोवा महामार्गाचे काम व सुरू असलेली अपघतांची मालिका यावर कोंकण संपर्क प्रमुख प्रदिप कणसे आणि कोकण विभाग अध्यक्ष सचिन सावंत-देसाई यांनी मुंबई महामार्गाच्या सध्यस्थीत चालू असलेल्या कामावर ताशेरे ओढले व नवीन कार्यकारिणी जाहीर होताच याविरोधात मोठ्या आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.
यावेळी माणगांव, रोहा, महाड, श्रीवर्धन, म्हसळा, रोहा, पोलादपूर, तळा, मुरुड या तालुक्यांची रायगड जिल्हा दक्षिण विभाग कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली व नूतन जिल्हा कार्यकारिणी नियुक्तीच्या अनुषंगाने कार्यकर्ता मेळावा घेऊन इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. येत्या १५ दिवसात नूतन कार्यकारिणी निवड मेळावा घेण्याकरिता रायगड दक्षिण जिल्हा 'प्रभारी' अध्यक्षपदी विश्वनाथ मगर यांची निवड करण्यात आली. तरुणांचे आर्थिक सक्षमीकरण करणे, रोजगार व व्यवसायातील नवीन संधी तरुणांना उपलब्ध करून देणे हे ध्येय धोरण समोर ठेऊन संभाजी ब्रिगेड येत्या काम करणार असून तरुणांनी मोठ्या प्रमाणात संभाजी ब्रिगेडमध्ये सामील होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.