रोहा (समीर बामुगडे) : रोहा तालुक्यातील निवी गावचे अनिलभाई बामुगडे यांच्या मातोश्री विजया रामचंद्र बामुगडे (वय ७५ वर्षे) यांचे निधन झाले. या दुःखद घटनेने समस्त बामुगडे कुटूंबासह गावावर शोककळा पसरली. दशक्रिया विधी १५/८/२०२१ रोजी महादेव मंदिर येथे होणार आहेत. तसेच उत्तर कार्य दिनांक १७/८/२०२१ रोजी राहत्या घरी निवी येथे होणार असल्याची माहिती अनिलभाई बामुगडे यांनी दिली. कै. विजया रामचंद्र बामुगडे ह्या निवी गावच्या आदर्श गृहिणी म्हणून निवी गावसह पंचक्रोशीत प्रसिद्ध होत्या. त्यांचे अल्पशा आजारने निधन झाले. त्यांनी आपल्या दोन पुत्र व कन्या यांचे सर्वांचे चांगले संगोपन केले. त्यांच्या पश्चात मुले, नातवंडे व सुन असा परिवार आहे.
वृक्षारोपण करुन दिला पर्यावरण प्रेमाचा संदेश "निगूडशेत प्रिमियर लिग" च्या टिम्सचा कौतुकास्पद उपक्रम तळा (विशेष प्रतिनिधी) :- तळा तालुक्यातील निगूडशेत गावातील ग्रामस्थ, युवक आणि महिलांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा आणि निसर्गावरील प्रेमाचा संदेश दिला आहे, तब्बल तीन किलो मीटर अंतर रस्त्याच्या दुतर्फा शेकडो झाडे लावून वृक्षारोपण केले. निगूडशेत गावातील "निगूडशेत प्रिमियर लिग" च्या टिम्सने आयोजित केलेला भव्य वृक्षारोपणाचा उपक्रम रविवारी पार पडला. गावातील आणि मुंबईतील असंख्य ग्रामस्थ, महिला, तरुणांनी हातात झाडे, पावडे, टिकाव घेऊन वृक्षारोपणाचा सोहळा साजरा केला. या वेळी शेकडो झाडांची लागवड करण्यात आली. लावलेली झाडे संवर्धन करून मोठी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. त्यासाठी उपस्थित प्रत्येकाने झाड दत्तक घेण्याचा संकल्प केल्याचे सरपंच अनिता सरफळे आणि ग्रामपंचायत सदस्य रामदास मोरे यांनी सांगितले. दरम्यान संपूर्ण निगूडशेत गावातील आणि मुंबईकर ग्रामस्थ वृक्षरोपणात सहभागी झाल्याने सबंध तालुक्याला आगळा वेगळा संदेश मिळाल्याचे अधोरेखीत झाले. याप्रसंगी वृक्षारोपणासाठी ...