महाड-पोलादपूर येथील पूरग्रस्तांना महिला सुरक्षा संघटनेने दिला मदतीचा हात!
रोहा (समीर बामुगडे) : महाड, पोलादपूर या तालुक्यातील गावामध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊन संपूर्ण गावे बेघर झाली, तर काही गावे दरडीखाली जाऊन अनेकजण मृत्यूमुखी झाले. येथील पूरग्रस्त नागरिकांना महिला सुरक्षा संघटनेने मदतीचा हात दिला!
महिला सुरक्षा संघटनेच्या कोकण विभाग अध्यक्षा दिपीकाताई चिपळूणकर यांच्यासह आरती काबले, सुरेखा शित्रे, मोनिका चंदने यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.