स्वतंत्र्य दिनानिमित्त बहुजन युथ पॅन्थर संघटने मार्फत फळ वाटप
माणगांव (प्रतिनिधी) : बहुजन युथ पॅन्थरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व संस्थापक भाई जाधव यांच्या आदेशानुसार रोहा तालुका पॅन्थर कडून कोलाड येथील लेप्रसी रुग्णांना 75 व्या स्वतंत्र्यदिना निमित्त बहुजन युथ पॅन्थरचे कोकण प्रदेश अध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते फळ वाटप करण्यात आले. तसेच कोलाड पोलीस ठाण्यातील कर्मचारी यांनी कोविड काळात योग्य काम केल्यामुळे त्यांना सुद्धा या संघटने मार्फत फळ वाटप करण्यात आले.
यावेळी बहुजन युथ पॅन्थर रायगड जिल्हा उपाध्यक्ष मंदेश मोरे, रोहा तालुका अध्यक्ष गणेश कांबळे, तळा तालुका अध्यक्ष संतोष नाक्ते व बहुजन युथ पॅन्थर रोहा तालुक्यातील पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी कोलाड येथील ज्येष्ठ नागरिक सभागृह हॉलमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेमध्ये शकूरभाई रहाटविलकर यांनी बहुजन युथ पॅन्थर संघटनेेमध्ये प्रवेश केला. त्यांना या संघटनेत कोकण प्रदेश उपाध्यक्ष पद देण्यात आले. तसेच रोहा तालुक्यातील अनेक तरुणांनी या संघटनेचे काम पाहून संघटनेत दाखल झाले.
कोकण प्रदेश अध्यक्ष विजय जाधव व रायगड जिल्हा उपाध्यक्ष मंदेश मोरे यांनी उपस्थित तरुणांना या संघटनेची ध्येय-धोरणे समजावून सांगितली. या वेळी उपस्थित तरुणांनी सुद्धा त्यांचे मनोगत व्यक्त केले. तसेच शकूरभाई रहाटविलकर यांनी संघटनेच्या कार्यालयाला मदत जाहीर केली. शेवटी रोहा बहुजन युथ पॅन्थरच्या वतीने सर्वांचे आभार मानले.