तळा तहसिल येथे स्वतंत्र्यदिन उत्साहात साजरा
तळा (संजय रिकामे) : तळा तहसील कार्यालयात 75 वा स्वातंत्र्यदिन सकाळी 9.05 वा. तहसीलदार अण्णापा कनशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. ध्वजारोहणा वेळी तळा पोलीस निरीक्षक श्री. गेंगजे आणि सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी ध्वजारोहणास मानवंदना दिली. यावेळी तळा पंचायत समिती सभापती सौ. अक्षरा कदम, उपसभापती गणेश वाघमारे, सदस्य देवाचा लासे, माजी नगराध्यक्षा, भाजपा प्रदेश सचिव रवीभाऊ मुंढे, शिवसेना शहर प्रमुख राकेश वडके, भाजपा तालुका अध्यक्ष ॲड. निलेश रातवडकर, नगरसेवक चंद्रकांत रोडे, ॲड. चेतन चव्हाण, काँग्रेस तालुका अध्यक्ष खेळु वाजे, तळा प्रेस क्लब अध्यक्ष संजय रिकामे, पत्रकार श्रीकांत नांदगावकर माजी उपसभापती चंद्रकांत राऊत, नाना भौड, आदी मान्यवर उपस्थित होते.
ध्वजारोहण झाल्यानंतर तहसिल कार्यालयात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पुरस्थिती निर्माण झाली त्यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने कोवीड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि रुग्णांवर योग्य ते उपचार करुन त्यांना कोरोना या आजारातून बाहेर काढण्यासाठी अतोनात प्रयत्न करणारे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अमोल बिरवडकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे तहसीलदार आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
तळा नगरपंचायत येथे नगराध्यक्षा रेश्मा मुंढे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याचप्रमाणे तळा पंचायत समिती येथे सभापती अक्षरा कदम यांच्या हस्ते तर पोलीस ठाणे, वेदक इंजिनिअर काॉलेज तळा प्रा.शाळा, गो म.वेदक विद्यामंदिर, निकम, इंग्लिश मिडीयम हायस्कूल, पोस्ट ऑफिस, सहकारी बँका उर्दू हायस्कूल अशा ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शासकीय कर्मचारी, विविध खात्याचे अधिकारी, विविध पक्षाचे नेते, शाळा, कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक वर्ग उपस्थित होते.