महाड येथे माजी सभापती रविंद्र नटे आणि सुवर्णकार संघटनेचे मदतकार्य
तळा (संजय रिकामे) : महाड व पोलादपूर तालुक्यातील महापुरासोबतच भुस्खलन होऊन दरडी कोसळण्याच्या घटना 22 जुलै 2021 रोजी घडल्या. 24 तासांमध्ये झालेल्या महाबळेश्वर येथील 594 मीमी तर पोलादपूर तालुक्यातील 271 मीमी अतिवृष्टीमुळे सावित्री नदीचे पात्र ओसंडून वाहू लागले. यंदाच्या महापुरामध्ये महाड येथे सुवर्णकार संघटना मुंबई यांचे मदतकार्य उल्लेखनीय ठरले.
तळा पंचायत समितीचे माजी सभापती आणि मुंबई येथील सुवर्णकार संघटनेचे सदस्य रविंद्र नटे आणि त्यांचे सहकारी यांनी स्वखर्चाने साडी ब्लँकेटचे वाटप केले संघटनेचे संतोष निबाळकर, महेंद्र टिंगरे, सहदेव महाडीक, विजय काते, अभिषेक निंबाळकर, प्रकाशज मोकाशी,भावू पुजारी, अनंत फिलस, श्री. अनिल, श्री. संजय, श्री. रूपेश या सर्व सदस्यांनी निस्वार्थी भावनेने सहकार्य केले.
रायगड जिल्ह्यातील महाड व पोलादपूर तर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण व खेड भागात फिरताना अनेकांना अतिवृष्टीमुळे महापुरामध्ये सर्वस्व गमवावे लागले अन् होते नव्हते सगळे गेले. डोळयांमध्ये फक्त पाणी राहिले अचानक अस्मानी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काही क्षणात या भागातील सर्व भाग जलमय झाल्याने या भागाची मोठया प्रमाणात नुकसान झाले. व्यापारी वर्गालादेखील मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने या भागात सुमारे तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या माणगाव व विविध बाजारपेठेतून नागरिकांना आधार घ्यावा लागत आहे. मात्र, त्यांच्याकडे असणारी दुचाकी, चारचाकी वाहनेदेखील पाण्यामध्ये गेल्याने येथील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. मदतीचा ओघ महापूरापेक्षा अधिक दिसून येत असला तरी या भागात खरी गरज आहे, ती या भागातील जनतेला संसार उपयोगी भांडी मिळणे अत्यंत गरजेचे होते. कारण येथील नागरिकांना साहित्य नसल्यामुळे कपडे भांडी हेदेखील तेवढेच महत्त्वाचे होते ती गरज ओळखून सुवर्णकार संघटना मुंबई यांनी गोंडीवले, कोल , महप्रळ, शीरगाव, कोंडीवते, नाते खींड, करंजखोल आणी शासनाची नवीन वसाहत येथील 500 परिवाराला साडी आणि ब्लँकेटचे वाटप केले. येथे मदत पोहचली पण आम्ही पाहीलीली परस्थिती खूपच विदारक होती समोर अमच्या कडून आलेली मदत ही आम्हालाच शून्य वाटत होती असे मत माजी सभापती रविंद्र नटे यांनी व्यक्त करुन मदतीचे आवाहन सर्वांना केले आहे.