माणगांव तालुक्यात कांचनबेन भबूतमलजी जैन व पार्शव मनी ट्रस्ट द्वारे मोफत रक्त तपासणी शिबीर
माणगांव (प्रतिनिधी) : माणगांव तालुक्यातील विविध गावांमध्ये कांचनबेन भबुत मलजी जैन व अभय पार्शव मनी ट्रस्ट द्वारे मोफत रक्त तपासणी 11 व 12 ऑगस्ट रोजी करण्यात आली. सदरच्या रक्त तपासण्या साई बौद्धवाडी, बाट्याची वाडी, राजीवली, निळगून, सुर्ले, इंदापूर, गोरेगाव पोलीस ठाणे, विहुले या ठिकाणी करण्यात आल्या.
या रक्त तपासणी शिबिरात एकूण सोळा रक्त तपासण्या करण्यात आल्या. यावेळी 747 लोकांनी या रक्त तपासण्या करून लाभ घेतला.या कांचनबेन भबुतूमलजी जैन ट्रस्टचे प्रमुख प्रकाश जैन व अभय पार्शव मनी ट्रस्टच्या प्रमुख मनीषा जैन या सातत्याने ग्रामीण व शहरी भागात समाज उपयोगी कामे करीत असतात. या रक्त तपासण्या करण्यासाठी स्पेक्टरम लॅबोर टीज वरळी मुंबई यांचे सहकार्य लाभले.
दोन दिवसाचे मोफत रक्त तपासणी शिबीर यशस्वी होण्यासाठी त्या गावातील लोकांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच मोहन प्रजापती, सिद्धार्थ मोरे, उमर सोलकर, संजय गमरे यांचे सुद्धा योग्य सहकार्य मिळाल्यामुळे ट्रस्ट द्वारे सर्वांनचे आभार व्यक्त करण्यात आले.