संघटनेच्या माध्यमातून केवळ मदत नाही तर आधार देण्याचे काम

पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना, माणगांव रायगड च्या वतीने तालुका अध्यक्ष श्री. आनंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नेहमी मदत  केली जाते. त्याचाच एक भाग म्हणून मागच्या आठवड्यात महाड व पोलादपूर तालुक्यात झालेला पाऊस आणि त्यानंतर आलेला महापूर आणि दरड कोसळून झालेली हानी न भरू शकणारी होती. अशा वेळी सदर बाधित कुटूंबांना मदतच नाही तर आधार देण्याची पण गरज ओळखून संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष श्री. अमोल माने, जिल्हाध्यक्ष श्री. मंदार रसाळ, सचिव श्री सत्यवान मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव तालुक्याचे कार्यतत्पर तालुका अध्यक्ष श्री. आनंद शिंदे यांनी संपूर्ण तालुक्यातील संघटनेच्या सदस्यांना मदतीचे आवाहन केले. त्यानुसार माणगांव तालुकातीलच नव्हे तर इतर तालुका, जिल्ह्यातून मदत मिळाली. त्यातून उघड्यावर पडलेल्या संसार, अनिश्चित काळासाठी गेलेली वीज, हे ओळखून चटई, ब्लॅंकेट, मेणबत्ती, कवाईल बॉक्स, माचीस बिक्स, रिन साबण, संतूर साबण इत्यादी आवश्यक साहित्याचे किट बनवले,. त्यातून 110 कुटूंबाना सादर मदत  देण्याचे ठरले.

दिनांक 28/7/2021 रोजी महाड शहरातील बोद्ध वाडी, नवेनगर, नदी किनारपट्टीवरील बाधित झालेले कुटूंब असलेलं गावी पिंपळदरी, भावे आदिवासी वाडी, चौधरी वाडी, भावे, तसेच पोलादपूर तालुक्यातील आंबे माची येथील 20 कुटूंब दरड कोसळल्याने बेघर झाले होते. त्यांना मदत दिल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया एकूण समाधान वाटले. त्यानंतर सुतार कुटूंब जे बेघर झाले होते त्यांना सुध्दा मदत दिली. एकंदरीत संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटूंबांना या संकटात मदत नव्हे तर आधार देण्याचे काम करण्यात आले. त्यासाठी विशेष मेहनत श्री. आंनद शिंदे, किशोर येवले, राजीव सावंत, अशोक कल्पे, भानुदास पाटील, जीवन तोरमल, मनोज नाईकडे इत्यादी संघटन कार्यकर्त्यांनी केले.

Popular posts from this blog