श्री. ओसवाल जैन संघ रोहा यांच्यातर्फे जीवनावश्यक वस्तूंची महाड येथे मदत

रोहा (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील सावित्री नदीला ढगफूटी सदृश्य अतीमुसळधार पावसाने महापूर परीस्थिती निर्माण केलीय. या महापूरामुळे महाड शहर पुर्णपणे पाण्याखाली गेलं आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने आता पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. तेथील नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे.

सध्या आम्ही तेथील परिस्थितीचा आढावा घेतला तेथील नागरिकांची भेट घेतली. तेव्हा त्यांना आपल्या मदतीची गरज आहे हे जाणवलं. ओसवाल जैन संघ रोहा तर्फे महाड येथील लोकांना फुल ना फुलाची पाकळी या स्वरूपात २५०० पाणी बॉटल, १५० ब्रेड पॅकेट, २०० लिटर दूध, कपडे, १०० पॅकेट मेणबत्ती अशा काही महत्त्वाच्या लागणाऱ्या वस्तू आपले कर्तव्य समजून मदत देऊ केली. 

त्यावेळी ओसवाल जैन समाजाचे अध्यक्ष श्री. दिलीप सोलंकी, उपाध्यक्ष श्री. राजेंद्र जैन, सचिव श्री. वसंत कोठार, कैलाश जैन, जीतु लुनिया, सुनील कोठारी,  प्रकाश जैन, मनीष ओसवाल, सनी जैन, रुचिका जैन, सायली दळवी इत्यादी जैन संघाचे मान्यवर मदतीस उपस्थित होते.

रोह्याच्या १९८९ व २००५ च्या महापुराचे प्रत्यक्षदर्शी सांगतात की, हा महाडचा पूर त्यापेक्षा ही भयंकर आहे. त्याचा प्रत्यय आज आलाच. लोकांची परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे जे जमेल, जसं जमेल तिकडे आपली मदत पोहचवा. आज एका क्षणात होत्याच नव्हतं झालंय आणि तिथल्या रहिवाश्यांच्या गोष्टी ऐकवत नाहीयेत आणि हालत बघवत नाहीत.

So keep helping in whatever way u can!

Popular posts from this blog