राजेंद्र भोरावकर आणि हरिशचंद्र कोळी आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित
तळा (संजय रिकामे) : रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रगत आणि शेतीनिष्ठ शेतकरयांचा सन्मान त्यांच्याच शेताच्या बांधावर जाऊन दरवर्षी केला जातो रायगङ प्रेस क्लब तळा शाखेच्या वतीने आदर्श शेतकरी पुरस्कार राजेंद भोरावकर ( रा.खांबवली) आणि हरिशचंद्र कोळी (रा.शेनाटे आदिवासीवाडी) यांना खांबवली येथे शेताच्या बांधावर पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी या सन्मान सोहळ्यास शेणवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष खेळु वाजे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व्ही. व्ही. यादव, स्वदेश फांऊडेशनचे मॅनेजर श्री. चव्हाण, तळा प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय रिकामे, उपाध्यक्ष किशोर पितळे, सचिव संध्या पिंगळे, पत्रकार पुरुषोत्तम मुळे, कृष्णा भोसले, श्रीकांत नांदगावकर, शेणवली ग्रामपंचायत सरपंच निकीता गायकवाड सत्कारमुर्ती राजेंद्र भोरावकर, हरिशचंद्र कोळी, कृषी अधिकारी श्री.काणेकर, कृृषी सहाय्यक श्री. म्हात्रे, बळीराजा शेतकरी संघटनेचे तळा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर भोईर, भास्कर गोळे, शेतकरी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष खेळुवाजे यांनी सांगीतले की रायगड प्रेस क्लब ही पत्रकारांची शिखर संस्था असुन रायगङ जिल्ह्यातील पत्रकारांच्या समस्या मार्गी लावण्या बरोबरच जिल्ह्यातील सामाजिक प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीकोनातुन महत्वाचे काम करत आहे.संघटनेने महामार्ग रुंदीकरणासाठी केलेल्या आंदोलनाची दखल शासनाला घ्यावी लागली.सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत असतानाच शेतीमध्ये शेतकरयांचा आत्मविश्वास वाढवण्याच्या हेतुनेच आदर्श शेतकरी पुरस्कार हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.तळा तालुक्या सारख्या दुर्गम भागात शेती हाच एकमेव उत्पनाच साधन असताना त्याकडे पाठ फिरवली जात आहे.काही हातावर मोजणारे शेतकरीआधुनिक शेती करुन वर्षाला चांगले उत्पन्न घेत आहेत त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी आणि त्यांचा आदर्श समोर ठेऊन ईतरांनी शेती करावी या हेतुने हा उपक्रम रायगड प्रेस क्लबने हाती घेतला असल्याचे सांगितले.यावर्षी राजेंद्र भोरावकर आणि हरिशचंद्र कोळी हे या पुरस्काराचे मानकरी ठरले असुन त्यांचे अभिनंदन त्यांनी यावेळी केले.व हा सन्मान पत्रकारांकडुन केला जात असल्याने त्यांचा देखील अभिमान वाटत असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. गटविकास अधिकारी व्ही.व्ही यादव यांनी रायगड प्रेस क्लब तर्फे दरवर्षी राबविण्यात येणारया या आदर्श शेतकरी पुरस्काराचे कौतुक करुन खरोखरच तळा तालुक्यातील पत्रकार योग्य शेतकरयाची निवड करुन त्यांचा सन्मान करत असल्याचे सांगीतले या दोन्ही शेतकरयांचा आदर्श घेऊन ईतर शेतकरयांनी शेती आणि शेती पुरक व्यवसाय करण्याचे आवाहन केले.शेती बाबत शासनाच्या विविध योजना असुन त्याचा विनीयोग आपण घ्यावा त्यासाठी लागणारी मदत शासनातर्फे केली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.केवळ भात शेतीवर लक्ष केंद्रित न करता ज्या उत्पादनाने आर्थिक लाभ होईल त्या पिकांची लागवड शेतकरयांनी केली पाहीजे असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
पंचायत समिती कृषी अधिकारी काणेकर याांनी शासनाच्या विविध योजनांची माहीती दिली तर तालुका कृषी पर्यवेक्षक म्हात्रे यांनी तालुक्यात सुरु असलेले विविध उपक्रम आणि आधुनिक शेती कशी केली जाते याची माहीती पुरवली. पुरस्कार मिळालेल्या शेतकरयांची प्रेरणा घेऊन ईतर शेतकरीदेखील आता जोमाने काम करुन पुढील वर्षी रायगड प्रेस क्लबचा आदर्श शेतकरी पुरस्कार मला कसा मिळेल यासाठी प्रयत्न करेल असे मत सर्व मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तळा प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय रिकामे यांनी केले, प्रास्ताविक पत्रकार पुरुषोत्तम मुळे यांनी केले तर आभार संजय रिकामे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रमुख पाहुणे गटविकास अधिकारी व्ही.व्ही.यादव कार्यक्रमाचे अध्यक्ष खेळुन वाजे, स्वदेशचे श्री.चव्हाण यांचे तळा प्रेस क्लब सचिव संध्या पिंगळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले व राजेंद्र भोरावकर आणि हरिशचंद्र कोळी यांना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व्ही.व्ही यादव यांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.