श्री गोरक्ष मंदिर, नवनाथ सांप्रदाय माणगांव तर्फे एक हात मदतीचा!

माणगांव (सचिन पवार) : रायगड जिल्ह्यातील महाड शहर व तालुक्यात दि. २२ जुलै २०२१ रोजी झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे सावित्री नदी, काळ नदी आणि गांधारी नदी यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने या नद्यांचे पाणी महाड नगरीतील घरांतून व दुकानांतून शिरून पूरपरिस्थिती निर्माण होऊन येथील नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होऊन अनेकांचे संसार उध्वस्त झाले.या महाड पूरग्रस्तांसाठी सामाजिक जाणिवेतून मौजे कोडीवते वसाहत (राजेवाडी) तसेच मौजे कोल येथे पूरग्रस्त बांधवाना जीवनाश्मक वस्तू १०० किटचे प्रत्यक्ष भेट देऊन प्रत्येकांचे घरी जाऊन आज वाटप करण्यात आले.

प. पु. सद्गुरू माऊली बेटकर महाराज यांच्या कृपाशीर्वादाने प. पु. गुरुवर्य श्री दादा महाराज शिंदे प. पु. गुरुवर्य श्री. यशवंत महाराज गायकवाड मठाधिपती याच्या आदेशान्वये व श्री शांताराम बाळू खाडे महाराज अध्यक्ष याच्या मार्गदर्शनाखाली, तसेच नाथ सांप्रदाय चे सर्व मंडळी याने एक हात मदतीचा... जीवनावश्यक वस्तूंचे किट घेऊन महाड पूरग्रस्त लोकांना मदत केली ईश्वर त्यांना या परिस्थितीतून सावरण्याचा मनोबल देवो त्याची प्रकुती निरोगी राहो ही सद्गुरु माऊली बेटकर बाबाच्या चरणी प्रार्थना करून दिवंगत बांधवाना भावपूर्ण श्रद्धांजली वाहली तसेच पुढाकार घेऊन आर्थिक हातभार लावला.

महाड पूरग्रस्तांसाठी एक मदतीचा हात घेऊन... एका गाडीत तांदूळ,गहू पीठ,तूरडाळ,साखर,चहा पावडर,टूथपेस्ट,लसूण,कपडे धुणे व अंघोळीचे साबण,मेणबत्ती अशा जीवनावश्यक वस्तूं महाड पूरग्रस्त लोकांना दादली येथील वरिष्ठ कार्यकर्ते श्री रामचंद्र (रामभाऊ) मारुती जाधव याच्या सहकार्याने वाटप करण्यात आले.

Popular posts from this blog