"महावितरण"चा मनमानी कारभार, वीज बिल भरण्यास ग्राहकांचा बहिष्कार!
माणगांव (सचिन पवार) : आपण कधी वीज बिल बारकाईने पाहता का ?
मग आता पहा .............
स्थिर आकार - मार्च - २०१७ मध्ये रु. - ५५.००
स्थिर आकार - एप्रिल - २०१७ मध्ये रु. - ५९.००
स्थिर आकार - मे - २०१७ मध्ये रु. - ६०.००
स्थिर आकार - एप्रिल - २०१८ मध्ये रु. - ६२.००
स्थिर आकार - मे - २०१८ मध्ये रु. - ६५.००
आणि आता ऑक्टोबर - २०१८ मध्ये १५.०० रु. ची वाढ करून ८०.०० रु. केला आहे.
प्रत्येक महिन्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या देयकाचे बारकाईने वाचन करा. सदरच्या बिलात स्थिर आकार या महिन्यापासून म्हणजे ऑक्टोबर - २०१८ पासून १५.०० रु. ची वाढ करून ८०.०० रु. केला आहे.
आणि एप्रिल २०२१ पासुन १०० रूपये ग्रामीण भागासाठी व ११० रूपये शहरी भागासाठी ,
या आधी एका नवीन आकाराची भर टाकली होती त्या नवीन आकाराचे नांव आहे. वाहन आकार @1.18 Rs /U. त्या आकारामुळे मागील बीलाच्या एकूण ३५ ते ४० % नी वीजबिलात वाढ झालेली आहे. प्रत्येक महिन्यात कोणता ना कोणता आकार वाढवून वीज वितरण कंपनी अक्षरशः आपली दिशाभूल करत आहे व आपण त्याकडे दुर्लक्ष्य करत आहोत. या विरोधात कोणी आवाज उठवेल का?
वीज वितरण कंपनीच्या ग्राहकांनो ही अचानक केलेली वाढ आपणास परवडणारी आहे का? विचार करा. या विरोधात आवाज उठवला नाही तर ठराविक अंतराने नवनवीन आकारात भर पडतच राहणार आहे.
कोरोना काळात लोकांना मदत करण्याऐवजी लूटमार ! तसेच कोरोना महामारीची साथ कोणाकडे काम सुरू आहे तर कोणाकडे नाही त्याच्यात सरकार अद्याप ही बिल माफ करीत नाही तर वीजबिल कमी करू इच्छित नाही एकाद्या गरीब शेतकऱ्याकडून बिल थकीत राहिले तर बिल खंडित केलं जातं आहे . यांच्यात लूटमार होत नाही का ,या विरोधात आवाज उठवला नाही तर तर ठराविक अंतराने नवनवीन आकाराचे भर नक्कीच पडत राहणार!