प्रदूषणाचा किल्ला लढविण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असमर्थ?
रोहा (समीर बामुगडे) : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रदूषण पसरविणाऱ्या कंपन्यांविरूद्ध कारवाई करण्याचा इशारा दिला असला तरी तो इशारा आता हवेतच विरून गेलेला असून रोहा तालुक्यातील एक्सेल कंपनीच्या प्रदूषणामुळे येथील स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला असून या परिसरातील भातशेतीही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेली आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी धाटाव एम.आय.डी.सी. परिसरातील कंपन्यांवर "वॉच" ठेवण्याचा फक्त दिखावा करीत असल्याचा येथील स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. पावसाच्या पाण्याचा फायदा घेऊन एक्सेल कंपनीतून येथील 'गंगा' नावाच्या नदीत केमिकयुक्त प्रदूषित पाणी सेडले जात आहे. तसेच कंपनीच्या परिसरातील रोठ खुर्द, रोठ बुद्रूक, निवी, वाशी, लाढर, तळाघर, बोरघर या गावांतील नागरिकांच्या शेतीवर देखील या प्रदूषित पाण्याचा गंभीर परिणाम होऊन येथील भातशेती उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेली आहे. असे असतानाही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी गप्प का आहेत? त्यांना कंपनीकडून काय "घबाड" मिळाले? अशीही चर्चा या परिसरात होताना दिसत आहे.