अभय पार्श्व मनी ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून महाड, पोलदपुर मधील पुरग्रस्त गांवाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
साई (हरेश मोरे) : २२-२३ जुलै रोजी झालेल्या अस्मानी संकटामध्ये महाड, पोलादपूर या तालुक्यातील गावामध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊन संपूर्ण गावे बेघर झाली, तर काही गावे दरडी खाली जाऊन अनेकजण मृत्यूमुखी झाले. याकरिता सर्व सामाजिक संस्था पुढे येऊन तेथील नागरिकांना मदतीचा हात पुढे करत आहेत.
अशीच एक सेवाभावी संस्था अभय पार्श्व मनी ट्रस्टच्या माध्यमातून ट्रस्ट चे प्रमुख प्रकाश जैन व मनीषा जैन यांनी 29 व 30 जुलै रोजी महाड व पोलादपूर पूरग्रस्थ गावांना भेटी देऊन बेघर झालेल्या कुटुंबाना धान्याची किट, चटई, कपडे, भांडी अशा अनेक वस्तूंचे वाटप केले. तसेच प्रकाश जैन यांनी सतत दहा दिवस ट्रस्टच्या माध्यमातून मदत करण्यात येईल असे आश्वासन पूरग्रस्त कुटुंबाना दिले. यावेळेस या ट्रस्टला सहकार्य करण्यासाठी सुशील जैन, सिद्धार्थ मोरे, उमेर सोलकर, ज्ञानेश्वर शेडगे, मोहन प्रजापती, संजय गमरे, रितिका भोस्तेकर, अरविंद अधिकारी, बळीराम खडतर, बाबू पटेल यांची उपस्थिती होती. त्याकरिता या सर्वांचे आभार वक्त करण्यात आले.