वरसे ग्रा. पं परिसरात बिल्डर्स लॉबीचे अतिक्रमण, बेजबादार अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष?

रोहा (समीर बामुगडे) : रोहा शहरालगत वरसे ग्रा. पं. परिसरात सध्या बेकायदेशीर अनधिकृत इमारतीची कामे जोरदारपणे चालू असून या कामापैकी बहुताश कामाना रायगड जिल्हाधिकारी आणि नगररचना विभाग अशा खात्यामार्फत बांधकाम परवाना देताना अनेक अटी व नियम लागू करण्यात आले आहेत हे सर्व नियम व अटी पायदळी तुडवून संबंधित बिल्डर्स बिनबोभाट कामे करीत असून व हे सगळे समोर दिसत असताना सुध्दा नगररचना विभाग आणि जिल्हा परिषदचा बांधकाम विभाग जाणून बजुन याकडे दुर्लक्ष का करत आहे ? असा प्रश्नन सध्या रोहा तालुक्यात चर्चिला जात आहे. अगोदरच रोहा शहर आणि परिसरला औधौगिकरणाने वेढले असून उरल्यासुरल्या काही जागा हे बिल्डर्स काहीतरी आमिष दाखवून हडप करुन व संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरुन मनमानी कारभार करीत आहेत. या सध्याच्या बांधकामाबाबत मध्यंतरी वृत्तपत्रांतून आवाज उठविण्यात आला होता. मात्र आजपर्यंत त्यामध्ये काहीही सुधारणा झाल्याचे दिसुन येत नाही. यामुळे बिल्डर्स लॉबीची हिम्मत वाढली असून त्यांनी खरोखरच शासकीय यंत्रणा विकत घेतली असल्याचे निदर्शनात येत आहे अशी चर्चा सुध्दा विभागातील रहिवाशी व जाणकार मंडळींमध्ये होत आहे. मध्यंतरी वृत्तपत्रांतून आलेल्या बातमीत संरपच, ग्रामसेवक व पुढारी  अधिकारी वर्गाला व्यवस्थित सांभाळून ही कामे बिनबोभाट चालू आहेत. असे वृत्त होते तरीसुध्दा आजपर्यंत काहीही कारवाई झालेली नाही. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. तसेच वरसे परिसरात अैवधे बांधकाम प्रकरणी संबंधित विभागाने स्थळ पाहणी करुन व सर्व्हे नंबरवरुन बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करुन व लोकप्रतिनिधींची वार्ड व प्रभागातून चौकशी करुन त्यांच्यावर व आणि खोटी माहिती पुरवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकाकडुन होत आहे.

Popular posts from this blog