राजिप शाळा रवाळजे कॅम्प एक सर्वगुण संपन्न शाळा!

पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : माणगांव तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेले रवाळजे गाव सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेले आणि तालुक्यापासून सर्वात दूर असे रवाळजे गाव राजिप शाळा रवाळजे कॅम्प शाळा शैक्षणिक आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत अव्वल स्थानावर आहे. 2019-20 वर्षात नाट्यीकरण स्पर्धेत तालुक्यात सर्व शाळा 1 ली ते 8 वी पर्यंतच्या असताना सुद्धा या शाळेच्या विद्यार्थ्यांनी अतिशय छान सादरीकरण केले होते. याच स्पर्धेत बीट स्तरावर शाळेचा प्रथम क्रमांक आला होता.
2019-20 साली झालेल्या मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेचे स्वरूप असणाऱ्या परीक्षेत शाळेतील दोन विद्यार्थी कु. कल्याणी किशोर येवले व समर्थ बालाजी बेलूरे हे दोन विद्यार्थी तालुकास्तरावर प्रथम क्रमांकावर होते आणि हेच विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत पहिल्या दहाच्या आत होते. बाकीचे दोन विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले होते आणि आता झालेल्या राष्ट्रीय विज्ञान स्पर्धेत शाळेचा एक विद्यार्थी कु. विराज विकास चव्हाण तालुकास्तरावर द्वितीय आला. राजिप शाळा रवाळजे कॅम्प शाळेचा प्रगतीचा आलेख नेहमी चढता राहिला आहे.
मे महिन्यात ग्रामपंचायतीच्या सहकार्याने शाळेला २८ मीटर संरक्षक भीतीचे काम करण्यात आले. शाळेच्या प्रगतीसाठी विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. हरिष लाड, सरपंच सौ. नम्रता लाड, तत्कालीन उपसरपंच सई राजीवडे, उपाध्यक्ष सौ. मयुरी शिंदे, तत्कालीन केंद्रप्रमुख सौ. कल्पना पाटील, विद्यमान केंद्रप्रमुख श्री. राऊत सर शाळेचे मुख्याध्यापक श्री. किशोर येवले आणि शिक्षिका श्रीमती परवीन शेख यांचे विशेष सहकार्य लाभले.

Popular posts from this blog