इंदापुर-दिघी रस्त्यालगत वृक्षारोपण
खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा उपक्रम
रोहा (रविना मालुसरे) : रायगड जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसने रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता. इंदापुर-दिघी रस्त्याचे रुंदीकरण करताना रस्त्याच्या दुतर्फा असलेले महाकाय वृक्ष व वनराई तोडण्यात आली. त्या ठिकाणी नवीन वृक्ष लावणे गरजेचे होते. ही बाब लक्षात घेऊन खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. आदितीताई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा युवती अध्यक्षा ॲड. सायली दळवी यांनी एक आगळा-वेगळा उपक्रम राबवला. त्यांनी एक नवीन संकल्पना सर्वांच्या समोर आणली. कोणताही प्रकल्प झाला की तेथील नागरिकांचे पुनर्वसन केले जाते. पण झाडांची मोठ्या प्रमाणावर वृक्ष तोड होते त्यांचे पुनर्वसन केले जात नाही. आदरणीय खासदार सुनिलजी तटकरे यांच्या वाढदिवस औचित्य साधून इंदापूर-दिघी रस्त्याची रुंदीकरण मध्ये झाडांची प्रचंड तोड झालेल्या भागात वृक्षारोपण करून झाडांचे पुनर्वसन ही आगळी वेगळी संकल्पना समाजापुढे ठेवण्याचा प्रयत्न रायगड जिल्हा युवती अध्यक्षा ॲड. सायली दळवी यांनी केला आहे.