माणगांव तालुका प्रेस क्लब तर्फे प्रगतशील शेतकऱ्यांना आदर्श पुरस्कार प्रदान

माणगांव (उत्तम तांबे) : बुधवार दि. २८ जुलै रोजी रायगड जिल्हा प्रेस क्लब सलग्न माणगांव तालुका प्रेस क्लब तर्फे आदर्श शेतकरी पुरस्कार २०२१ हा माणगांव तालुक्यातील दोन प्रगतशील शेतकऱ्यांना देण्यात आला. श्रीमती शकुंतळा मुकुंद साळवी मु. घोटवळ इंदापुर विभाग, तसेच श्री. सुरेंद्र पालांडे, मु. शिरवळी, निजामपुर विभाग यांना हे पुरस्कार देण्यात आले. यावेळी श्रीमती. शकुंतला साळवी यांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक सचिव दिपकशेठ जाधव यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. तसेच सुरेंद्र पालाडे यांना लोक शक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष तसेच माणगांव तालुका प्रेस क्लबचे कायदेशीर सल्लागार संजयजी सोनावणे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. 

यावेळी माणगांव प्रेस क्लब अध्यक्ष संतोष सुतार, कार्याध्यक्ष गौतम जाधव, उपध्यक्ष विश्वास गायकवाड, संघटक पदमाकर उभारे, सचिव सचिन वनारसे, सहसचिव हरेष मोरे, भुवन उपसरपंच नितिन शिर्के, शैलेश येलकर, खेमराज रावळ, संजीवनी शिर्के, तसेच घोटवळ व शिरवळी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Popular posts from this blog