अंगणात खेळत असलेल्या अल्पवयीन मुलीला घरात नेऊन केला बलात्कार, नराधमास अटक!
रायगड (प्रतिनिधी) : रोहा तालुक्यातील कोलाडपासून जवळच असलेल्या मढाली आदिवासीवाडी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडलीआहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
पिडीत अल्पवयीन मुलगी आपल्या घराच्या अंगणात एकटीच खेळत असताना आरोपी (रा. मढाली आदिवासी वाडी, पो. ऐनवहाळ, ता. रोहा, वय वर्ष २२) याने त्या लहान मुलीस त्याच्या राहते घरात बोलाऊन एकटी असल्याचा फायदा घेऊन घराचा दरवाजा लाऊन नराधमाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून संताप व्यक्त करण्यात येत आहे. कोलाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती बोराडे, पोलीस उपनिरीक्षक ए. एल. घायवट हे पुढील तपास करत आहेत. याप्रकरणी आरोपी विरोधात कोलाड पोलीस ठाण्यात भां.द.वि. कलम 376(2),(1), 376(3), 376(AB) बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोस्को) अधिनियम 2012,4,8,9, (M),10 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.