रोटरी क्लब रोहा सेंट्रल यांचा महाडकरांसाठी "एक हात मदतीचा"

रोहा (प्रतिनिधी) : मुसळधार पावसाने कोकणात हाहाकार माजवला आणि त्या पावसामुळे महाड शहर व तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले त्या मुळे महाड शहरात पूरस्थिती निर्माण झाली.  

लोकांच्या घरात होत नव्हतं ते सर्व पाण्यात वाहून गेले आणि अतिशय बिकट परिस्तिथी निर्माण झाली. 

"एक हात मदतीचा" अंतर्गत रोटरी क्लब रोहा सेंट्रल कडून सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून महाड शहरामधील नदी काठावरील कुंभार आळी, गवळी आळी, तांबट आळी, विरेश्वर मंदिर परिसर, काकरतळे या भागामध्ये ३५०० पाणी बॉटल्स (१ लिटर), ५००० बिस्कीटे, ५०० किलो फरसाण वाटप करण्यात आहे. या मदतीबद्दल नागरिकांनी भरभरून कौतुक केले. 

या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब अध्यक्ष डॉ. कैलास जैन, सचिव अजित तेलंगे, ए जी ए मयूर दिवेकर, डिस्ट्रिक्ट ऑफिसर गणेश सरदार, सूचित पाटील, विजय दिवकर, सिद्धार्थ हवळ, गितराज म्हस्के, रुपेश पाटील, डॉ. प्रथमेश बुधे, रुपेश कर्नेकर, रामा नाकती, दीपक सिंग व रॉट्रॅक्ट मेंबर रशीद खान, सत्येन देशपांडे उपस्थित होते.

सदर उपक्रमासाठी नगरसेवक राजेंद्र जैन, संदीप तटकरे, दीपक नायट्रेट, राकेश मोरे (श्री व्हिजन) व सर्व रोटरी मेंबर्स यांच्या आर्थिक मदतीसाठी अध्यक्ष डॉ. कैलास जैन यांनी विशेष आभार मानले.

Popular posts from this blog