नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या महाडकरांना "सुदर्शन"चा मदतीचा हात, पुरग्रस्तांना तात्काळ मदत सुपुर्द
रोहा (रविना मालुसरे) : कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये तर पावसाने रौद्ररुप धारण केले. शहरात व ग्रामीण भागात विक्रमी पाऊस कोसळला. महाडचा परिसर जलमय झाला. कदाचित इतिहासातील सर्वात मोठ्या नैसर्गिक आपत्तीला महाडकर सामोरे जात आहेत.
पुरग्रस्त नागरिकांना प्रशासनाकडून मदत केली जात आहे. मात्र ती पुरेशा प्रमाणात नाही. नागरिकांना तत्काळ मदत मिळावी यासाठी प्रशासनाकडून सामाजिक संस्था,आस्थापना व दानशुर नागरिकांना मदतीसाठी आवाहन करण्यात येत आहे.
सुदर्शन केमिकल्स लिमिटेड हि कंपनी आपत्तीकाळात नागरिकांच्या मदतीला सदोदित धाऊन जात असते. नागरिकांप्रती संवेदनशील असणाऱ्या सुदर्शन केमिकल्स कंपनीने महाडमधील नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला.
पूरग्रस्तांना तात्काळ अन्न, पाणी पुरविण्यासाठी रोहा तहसीलदार कविता जाधव यांनी मदतकार्य चालू केले आहे. त्यांनी सुदर्शन सी.एस.आर. फौंडेशन यांना मदतीचे आवाहन केले. तहसीलदार कविता जाधव यांच्या आवाहनास साद देत सुदर्शनने बिस्कीट, पाणी इत्यादी वस्तूरुपी मदत तात्काळ तहसील कार्यालय रोहा यांच्याकडे सुपूर्द केली. तसेच सदरची मदत तहसीलदार मॅडम यांच्या सूचनेनुसार त्वरित पूरग्रस्तांकडे रवाना करण्यात आली.
सुदर्शन केमिकल्स लिमिटेडने दाखविलेली तत्परता व सामाजिक उपक्रमातील आत्मियता हा कौतुकाचा विषय बनला आहे.