प्रदूषण पसरविणाऱ्या क्लॅरियंट कंपनीवर कारवाई का होत नाही? 

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी गप्प का? रहस्य काय?

दुषित सांडपाण्यामुळे भातशेती उध्वस्त हेण्याच्या मार्गावर, स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका!

रोहा (समीर बामुगडे) : दुषित (प्रक्रीया केलेले) सांडपाणी परिसरामध्ये पसरविणाऱ्या क्लॅरिंट कंपनीवर कारवाई न होण्याचे रहस्य काय? प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी अजूनही गप्प का? असा प्रश्न या परिसरातील नागरिकांसमोर उभा आहे. 

पावसाच्या पाण्याचा फायदा घेऊन क्लॅरियंट कंपनीतून मोठ्या प्रमाणात प्रकीयायुक्त दुषित पाणी या परिसरामध्ये सोडले जात असून या परिसरातील भातशेती उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेली आहे. 

या कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रणं मंडळ उपप्रादेशिक अधिकारी (रायगड-२) श्री. वि. वि. किल्लेदार यांनी लेखी पत्राद्वारे समज दिली होती, परंतु त्यांच्या सूचनेला कंपनीच्या व्यवस्थापनाने 'केराची टोपली' दाखविली आणि आपले दुषित काम नियमितपणे सुरू ठेवलेले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या कंपनीविरूद्ध तातडीने कडक कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिकांकडून करण्यात आली आहे.


Popular posts from this blog