राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केंद्र सरकार विरोधात रोह्यात निषेध मोर्चा

रोहा (रविना मालुसरे) : रोहा नगरपालिका कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा केंद्र सरकार विरोधात मोर्चा काढण्यात आला. सरकारने वाढवलेल्या पेट्रोल, डिझेल तसेच स्वयंपाकासाठी लागणारा गॅस सिलेंडर यांच्या किमतीत भरमसाठ वाढ केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य जनता त्रासली आहे. त्यातच हे वाढलेले दर पाहता सामान्य माणसाने जीवन जगायचं कसं? असा प्रश्न उभा राहतो. महागाईमुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. कोरोना काळात माणसाला काम धंदा नाही. असे असताना केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, सिलेंडर यांचे भाव अवास्तव वाढवले आहेत. 

याविरोधात शनिवारी दिनांक ३ जुलै सकाळी दहा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केंद्र सरकार विरोधात आंदोलन केले. कोरोनाचे नियम पाळून हा मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष मधुकर पाटील, विनोद पाशिलकर, युवा तालुकाध्यक्ष जयवंत मुंडे, महिला तालुकाध्यक्ष प्रितम पाटील, शहराध्यक्ष प्राजक्ता चव्हाण, राष्ट्रवादी कार्यकर्ते अमित मोहिते, संतोष भोईर, मंगेश देवकर, सारिका खंडागळे यांच्यासमवेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. मोर्चाला प्रतिसाद दिला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरुन आंदोलन करु असा इशारा मधुकर पाटील यांनी दिला.

Popular posts from this blog