राष्ट्रवादी काँग्रेसच्या रायगड जिल्हा सरचिटणीसपदी सुरेश मगर यांची निवड

रोहा (समीर बामुगडे) : खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष, माजी आ. सुरेश लाड यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्हा कार्यकारणी बैठकीत सुरेश मगर यांची रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. 

या बैठकीस पालकमंत्री अदितीताई तटकरे, आ. अनिकेत तटकरे, पक्ष निरीक्षक संजय वढावकर, रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष  मधूकरशेठ पाटील, तालुका अध्यक्ष विनोद पाशीलकर, ज्येष्ठ नेते शिवराम शिंदे,भाई टक्के, आलिबाग विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे, रोहा शहर अध्यक्ष अमित उकडे व रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

निवडी नंतर सुरेश मगर यांनी खा. सुनिल तटकरे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवत पक्ष संघटनेची जबाबदारी दिली आहे, हा विश्वास सार्थ करीत त्यांना अभिप्रेत असलेले पालकमंत्री आदितीताई तटकरे, आ. अनिकेत तटकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना वाढीसाठी काम करणार असल्याचे सांगितले.

Popular posts from this blog