बोर्लीपंचतन येथे सुसज्ज मच्छी मार्केट असताना मच्छी विक्रेत्या महिला मच्छी विक्रीसाठी रस्त्यावर!
बोर्लीपंचतन (मुझफ्फर अलवारे) : श्रीवर्धन तालुक्यातिल बोर्लीपंचतन येथील शिवाजी चौकाजवळ मच्छी मार्केट असून देखील काही मच्छी विक्रेत्या महिला शिवानी हॉटेल जवळील मुख्य वहातूक रस्त्यावर मच्छी विक्रीसाठी बसलेल्या असतात. त्यांच्यावर दिघी सागरी पोलीस ठाण्याकडून वारंवार दंडात्मक कारवाई करुन देखील पोलीस जाताच त्यांच्या आदेशाला या मच्छी विक्रेत्या पाठ फिरवत असतात.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा जोमानने काम करीत आहेत. शासनाचे नियम पाळून स्वतःची काळजी घ्या व आपले कुटूंब सुरक्षित ठेवा असा संदेश दिघी सांगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी दिला आहे. शासनाचे नियमाचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
दिघी, आदगाव, कुडगाव, तुडूंबाड येथील खाडीतील बोंबील, खारवा, ओला जवळा, मादींली, ढोमी, शिंगटी, कोळंबी, लहान पापलेट, चोळट आशा विविध प्रकारची दिघीच्या खाडीतील मच्छी सध्या खवय्यांच्या पसतिंस उतरली असून ती घेण्यासाठी खवय्यांची गर्दीही रस्त्यावर होत आहे.
मच्छी मार्केट सोडून मुख्य रस्त्याच्या बाजुला मच्छी विक्रेत्या बसल्या मुळे गर्दी होते. वाहतूक कोंडी होते. मच्छीच्या सांडलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. याशिवाय सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडत आहे. पोलीसांची दंडात्मक कारवाई देखील सुरूच आहे. मात्र बोर्लीपंचतन ग्रामपंचायतीने देखील रस्त्यावर मच्छी विक्री करणाऱ्या मच्छी विक्रेत्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे.