पिंपरी-चिचंवड मधील युवकांनी महाड पूरग्रस्तांना केली घरपोच मदत

पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : रायगड जिल्ह्यातील महाड येथे आलेल्या पुरामुळे येथील व्यापाऱ्यांचे व नागरिकांचे कधीही भरून न निघणारे भयंकर नुकसान झाले आहे. दूरदर्शनवर तसेच प्रत्येक वाहिनीवरून पुरग्रस्तांचे प्रत्यक्ष चित्रण दाखवीत असल्याने रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र पुरग्रस्तांच्या प्रति शोकाकुल झाला आहे आणि म्हणून प्रत्येक राज्यातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. परंतु पुरग्रस्तांसाठी जी मदत येत आहे ती खऱ्या पूर ग्रस्तांपर्यंत पोहचताच नाही असे मेसेज मोबाईल वरून फिरू लागले आहेत आणि म्हणून आता काही संघटना थेट पुरग्रस्तांच्या घरपोच मदत देऊ लागले आहेत. 

पिंपरी चिंचवडमधील रायगड युवा शक्ती व रायगड मित्र मंडळाच्या युवकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी जीवनावश्यक वस्तूंचा टेम्पो घेऊन थेट महाड गाठले व खरोखच ज्या पूरग्रस्त नागरिकांना मदतीची गरज आहे अशा गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष घराघरांमध्ये जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे पॅकेज दिले. मदत पोहचलेली गावे बिरवाडी मधिल आदर्श नगर, बापट नगर, दुधाने आवाड तसेच महाड मधील आसन पोई व सरेकर आळी येथे ही मदत पोहचवली. 

दुर्ग दुर्गेश्वर किल्ले रायगडचे राज पुरोहित, प्रकाश स्वामी जंगम, घाडगे सर, शिवव्याख्याती सिद्धीताई घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरील मंडळाचे सभासद मंडळाचे सल्लागार नंदेश मोरे, बाळकृष्ण पलांडे, गजानन आंब्रे व सदस्य अमित म्हामुणकर, मछिंद्र देशमुख, उमेश खोपकर अवधूत पलांडे, विनय मोरे, संतोष कळमकर, निलेश सावंत, ओमकार आंब्रे, संकेत म्हामुणकर या सर्वांनी कमीत कमी वेळेत योग्य ठिकाणी मदत केल्याने रायगड जिल्ह्याबद्दलची त्यांची तळमळ दिसून आली. तसेच थेट मदत दिल्या बद्दल महाड वासियांनी या नवयुवकांना धन्यवाद दिले.

Popular posts from this blog