भारतीय हवामान विभागाच्या सूचनेनुसार रायगड जिल्ह्यात २४ जुलै पर्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता!
रोहा (सदानंद तांडेल) : जिल्ह्यातील सखल भागातील विशेषतः नदी, खाडी, समुद्र किनाऱ्यावरील गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
दरडप्रवण गावातील नागरिकांनी दक्षता घ्यावी. पावसाचे प्रमाण विचारात घेऊन अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच प्रवास करावा.
धबधबा, तलाव, खाडी, नदी, समुद्राच्या पाण्यात पोहण्यासाठी जावू नये. गड/किल्ले येथे ट्रेकिंगसाठी पावसात जाऊ नये. पाण्याचा वेग जास्त असल्याने नदी, नाले धाडसाने क्रॉस करून जाण्यासाठी प्रयत्न करू नये. पुलावरून, रस्त्यावरून संरक्षक दगड पाण्याखाली गेले असल्यास त्यावरून वाहन चालवू नये. आपत्कालीन प्रसंगी जवळच्या तहसील कार्यालय किंवा पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग तर्फे करण्यात आले आहे.