जि. प. सदस्य वासंती वाघमारे व सरपंच निलीमा निगडे यांच्या हस्ते प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यात दोन हजार रुपये व दोन हजार रुपये किंमतीचे धान्याचे किट वाटप

पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : माणगांव तालुक्यातील कुंडलिका विद्यालय पाटणूसच्या सभागृहात खावटी अनुदान योजने अंतर्गत पाटणूस येथील जिल्हा परिषद सदस्य वासंती वाघमारे व ग्रामपंचायत पाटणूस च्या सरपंच निलीमा निगडे यांच्या हस्ते पाटणूस पंचक्रोतील आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तू व धान्याचे किट वाटप करण्यात आले. 

अनुसूचित जमातीच्या कुटुंबाना सहाय्य करण्यासाठी खावटी योजने अंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे धान्य किट जिल्हा परिषद सदस्य वासंती वाघमारे, पाटणूस ग्रामपंचायसरपंच निलीमा निगडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. 

सदर धान्याचे वाटप हे महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास मंडळ नाशिक व प्रादेशिक कार्यालय जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पेण रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने सदर अन्न धान्य किटचे वाटप करण्यात आले. 

यावेळी वनवासी कल्याण आश्रम संचालित कै. सौ. वि. गो. गांधी माध्य. आश्रम शाळा उतेखोल माणगांव चे मुख्याध्यापक अरुण पाटील, सह शिक्षक सुशीलकुमार लामतुरे, काशिनाथ गाणेकर, दिनेश पारधी, सुनील शेडगे, सामाजिक कार्यकर्ते संतोष वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत मोरे, रोशन पवार, सदस्या दुर्वा चव्हाण, रिया निगडे इ. मान्यवर व बहुसंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते.

Popular posts from this blog